Supreme Court On DNA Test | डीएनए टेस्टसाठी सक्ती करणे व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supreme Court On DNA Test | सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले की, सामान्य प्रक्रियेच्या दृष्टीने नव्हे, तर आवश्यक प्रकरणातच डीएनए चाचणी (Supreme Court On DNA Test) चे निर्देश दिले पाहिजेत कारण डीएनए चाचणीसाठी तयार नसलेल्या व्यक्तीला सक्ती करणे व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन (violation of personal freedom and right to privacy) आहे. न्यायालयाने म्हटले की, अशा परिस्थितीत जिथे संबंध सिद्ध करण्यासाठी इतर पुरावे उपलब्ध आहेत, न्यायालयाने सामान्यपणे रक्त चाचणीचे आदेश देणे टाळले पाहिजे.

न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी (Justice R. Subhash Reddy) आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय (Justice Hrishikesh Roy) यांच्या खंडपीठाने म्हटले की, डीएनए एखाद्या व्यक्तीसाठी (जुळी मुले सोडून) अद्वितीय आहे आणि त्याचा वापर एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी, कौटुंबिक संबंधांचा शोध घेणे किंवा इथपर्यंत की संवेदनशील आरोग्य माहिती प्रकट करण्यासाठी केला जाऊ शकतो (Forcing for DNA test is Violation of personal freedom and right to privacy).

खंडपीठाने म्हटले की, एखाद्या व्यक्तीला अशा प्रकरणांत डीएनएसाठी नमूना देण्यासाठी सक्ती केली जाऊ शकते का,
याचे उत्तर के.एस. पुट्टस्वामी विरूद्ध भारत संघ यांच्यात या न्यायालयाच्या सर्वसंमत निर्णयातून घेतला जाऊ शकतो,
ज्यामध्ये गोपनीयतेच्या अधिकाराला भारतात संवैधानिक प्रकारे संरक्षित अधिकार घोषित करण्यात आले आहे.
जेव्हा वादी स्वता डीएनए चाचणी करण्यासाठी तयार नाही, तेव्हा त्याला ते करण्यासाठी सक्ती करणे त्याच्या
व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि त्याच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होईल. (Supreme Court On DNA Test)

न्यायालयाने (Supreme Court) दिवंगत त्रिलोकचंद गुप्ता आणि दिवंगत सोनादेवी
यांनी मागे ठेवलेल्या संपत्तीच्या मालकीच्या घोषणेच्या विनंतीबाबत अशोक कुमार यांच्याद्वारे दाखल एका अपीलावर हा निर्णय दिला.
त्यांनी दाम्पत्याच्या तीन मुलींना खटल्यात प्रतिवादी म्हणून सादर केले आणि स्वता त्रिलोकचंद गुप्ता आणि सोनादेवी यांचा मुलगा असल्याचा दावा केला.

Web Title :- Supreme Court On DNA Test | forcing a person to undergo a dna test impinge on his personal liberty and his right to privacy supreme court news in marathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tarak Mehta Ka Ulta Chashmah | ‘तारक मेहता’ फेम नट्टू काका यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन

Cold Water Bathing | रोज गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर व्हा सावध! संशोधनातून समोर आली ‘ही’ गोष्ट; जाणून घ्या

Auto Debit Transaction | जर ऑटो-डेबिटने भरत असाल वीज, पाणी आणि LPG चे बिल तर RBI चा ‘हा’ नियम परिणाम करू शकतो, जाणून घ्या कसा