Supreme Court On Maharashtra Bull Cart Racing | सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! बैलगाडा शर्यतीला परवानगी, आता सर्ज्या-राजाची जोडी पुन्हा उधळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supreme Court On Maharashtra Bull Cart Racing | संपुर्ण महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा असणार्या बैलगाडा आणि जल्लीकट्टू खेळासंदर्भात सुप्रीम कोर्टाने एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे (SC Decision On Bailgada Sharyat). यासंदर्भातील सुनावणी डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण झालेली होती. त्यावेळी याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला होता. आता अखेर आज सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आहे. आता महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती (Maharashtra Bull-Cart Racing), कर्नाटकमधील कम्बाला (Karnataka-Kambala) आणि तामिळनाडूमधील जल्लीकट्टू (Tamil Nadu-Jallikattu) या खेळांना परवानगी देण्यात आली आहे. प्राणीमित्र संघटनांनी अशा खेळांमध्ये प्राण्यांचे मोठे हाल होत असल्याचा दावा करत याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. (Supreme Court On Maharashtra Bull Cart Racing)
महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक सरकारने अनुक्रमे बैलगाडा शर्यत, जल्लीकट्टू आणि कम्बाला या खेळांसाठी वन्यजीव संरक्षण कायद्यात काही सुधारणा केल्या होत्या. त्यानुसार राज्यांनी या खेळांना परवानगी दिली होती. पण, राज्य सरकारच्या या निर्णयांना सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. याबाबतची सविस्तर सुनावणी घेण्यात आली होती. डिसेंबर 2022 मध्ये निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज सुप्रीम कोर्टानं अखेर निकाल दिला असून या खेळांना परवानगी देण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारांनी पारित केलेल्या कायद्यांना आव्हान देणारी याचिका आज फेटाळून आवली आहे.
सन 2014 मध्ये सुप्रीम कोर्टानं जल्लीकट्टू आणि त्यासारख्या इतर खेळांवर बंदी घालण्याचा निर्णय दिला होता.
त्यानंतर ज्या-त्या राज्य सरकारांनी या कायद्यातच सुधारणा करून नवे विधेयक मंजूर केले होते.
आता मात्र, सुप्रीम कोर्टानं या खेळांना परवानगी दिल्यामुळे महाराष्ट्रात सर्ज्या-राजाची जोडी पुन्हा उधळणार हे मात्र निश्चित.
Web Title : Supreme Court On Maharashtra Bull Cart Racing | SupremeCourt Constitution Bench to pronounce judgment today on petitions challenging the laws permitting Jallikattu, Kambala & bull-cart racing Tamil Nadu, Karnataka & Maharashtra
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा