Supreme Court On Maharashtra Municipal Election 2022 | महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीसंदर्भात सुप्रीम कोर्टानं दिले महत्वाचे निर्देश, जाणून घ्या

महापालिका निवडणुका टप्प्याटप्प्यानं होण्याची चिन्हे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supreme Court On Maharashtra Municipal Election 2022 | मागील अनेक दिवसांपासून राज्यातील संपुष्टात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात (Maharashtra Municipal Election-2022) नुसती चर्चा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या असतानाच आता सर्वोच्च न्यायालयातून (Supreme Court) एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्यानं होण्याची शक्यता आहे. (Supreme Court On Maharashtra Municipal Election 2022)

 

जिथं पाऊस नसेल तिथं निवडणूक घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला (Maharashtra State Election Commission) दिले आहेत. जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणुका जाहीर कराव्यात असं देखील न्यायालयाने निवडणूक आयोगाला सुचवलं आहे. तसेच, ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या ठिकाणी निवडणुका घ्यायला हरकत नाही, असंही न्यायालयाने सांगितलं आहे.

 

काही दिवसांपुर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला (Maharashtra State Government) एक झटका देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्या असा आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिला होता. तसेच लवकर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या होत्या. दरम्यान, निवडणूक आयोगाने महानगरपालिका, नगरपंचायत निवडणूक सप्टेंबरमध्ये, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणूक ऑक्टोबरमध्ये घेण्यात याव्यात अशी विनंती केली होती. यावर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

आगामी काही दिवसांत पावसाळा सुरु होईल याच दरम्यान राज्यातील निवडणुका पार पडणार आहेत.
परंतु, निवडणुकांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ज्या ठिकाणी पाऊस नसेल तिथं निवडणुका घ्यायला काय हरकत आहे?
असं न्यायालयानेच विचारल्यानं जिथे पाऊस नसेल तिथं आधी निवडणुका होण्याची शक्यता आहे
तर जिथं पाऊस असेल तिथं नंतर निवडणुका घेतल्या जाऊ शकतात.
यानंतर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

 

Web Title :- sc decision about maharashtra zilla parishad municipal corporation election
maharashtra local body election 2022 important direction given by supreme court polls

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा