Supreme Court On OBC Political Reservation Maharashtra | सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का, ‘त्या’ निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supreme Court On OBC Political Reservation Maharashtra | सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) मोठे निर्देश दिले आहेत. ओबीसी आरक्षणास मंजुरी देण्यापूर्वी जाहीर झालेल्या 365 जागांवरील निवडणुका (Elections) या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. या निवडणुकीसाठी कोणत्याही प्रकरची नवीन अधिसूचना (Notification) जारी करता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra State Election Commission) या निर्देशांचे पालन केले नाहीतर हा कोर्टाचा अवमान केला असे समजले जाईल, असेही कोर्टाने म्हटले आहे.

 

बांठिया आयोगाने (Banthia Commission) ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. ओबीसी आरक्षण देत असताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच ओबीसी यांची सदस्य संख्या 50 टक्क्यांहून अधिक होऊ नये अशी अट आहे. त्यानुसार राज्यातील 27 महापालिकांमध्ये ओबीसींसाठी वेगवेगळ्याजागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने बांठिया आयोगाचा अहवाल मान्य करत राज्यात ओबीसींना राजकीय आरक्षण लागू करण्यास मंजुरी दिली. (Supreme Court On OBC Political Reservation Maharashtra)

 

कोणत्या निवडणुकांना फटका बसणार ?

राज्य निवडणूक आयोगाने 92 नगर परिषदांच्या निवडणुका (Municipal Council Elections) जाहीर केल्या होत्या. या नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी सुरु होती. या 92 नगरपरिषदांमधील निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरु होता. सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर या संदर्भातील निवडणूक प्रक्रिया सुरु झाली होती. त्यामुळे आता तिथे ओबीसी आरक्षण लागू करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 जुलै रोजी या 92 नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित केल्याची घोषणा केली होती.

 

निवडणूक होणारे जिल्हे

पुणे (Pune), सातारा (Satara), सांगली (Sangli), सोलापूर (Solapur), कोल्हापूर (Kolhapur), नाशिक (Nashik),
धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar), जळगाव (Jalgaon), अहमदनगर (Ahmednagar), औरंगाबाद (Aurangabad),
जालना (Jalna), बीड (Beed), उस्मानाबाद (Osmanabad), लातूर (Latur), अमरावती (Amravati), बुलढाणा (Buldhana)
या 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार होत्या.

 

Web Title : –  Supreme Court On OBC Political Reservation Maharashtra | obc political reservation supreme court direct on obc reservation for local body election in maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा