Supreme Court on Parambir Singh | मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांना अटकेपासून दिलासा देण्यास SC कडून स्पष्ट नकार; म्हणाले – ‘कुठं आहेत परमबीर सिंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supreme Court on Parambir Singh | मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांना काल (गुरूवारी) मुंबई किला न्यायालयाने फरार घोषित केले आहे. त्यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर खंडणीचे आरोप केल्यानंतर राज्यभरच नव्हे तर देशात खळबळ उडाली होती. मात्र, तेव्हापासून परमबीर सिंग हे बेपत्ता आहेत. त्याचबरोबर आज परमबीर सिंग यांना दिलासा देण्यास सुप्रिम कोर्टाने (Supreme Court on Parambir Singh) देखील नकार दिला आहे.

 

परमबीर सिंग यांच्या वकीलांनी सुप्रिम कोर्टात याचिका केली होती. परमबीर यांना अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठीची ही याचिका होती. त्यावर सुनावणी आज पार पडली. त्यावेळी न्यायमूर्तींनी (Justice S. K. Kaul) सिंग यांच्या वकिलांना सुनावलं आहे. तसेच, परमबीर सिंग कुठे आहेत, त्यांचा ठावठिकाणा काय, याची माहिती न्यायालयाला द्या, असे आदेश न्यायमूर्तींनी दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 नोव्हेंबर रोजी आहे. (Supreme Court on Parambir Singh)

 

न्यायमूर्ती एस. के. कौल म्हणाले, परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचे 4 गुन्हे दाखल आहेत. त्यांनी देशाबाहेर पळ काढल्याचं बोललं जात आहे. त्यावरून सर्वोच्च न्यायालयानं सिंग यांच्या वकिलांची झाडाझडती घेतली. ‘याचिकाकर्ते जगाच्या कोणत्या कोपऱ्यात आहेत? ते या देशात आहेत की देशाबाहेर गेलेत? याचिकाकर्ते कुठे आहेत ते आम्हाला सर्वप्रथम जाणून घ्यायचं आहे.

दरम्यान, सिंग यांना सुरक्षित वाटल्यास ते समोर येतील, असा युक्तिवाद परमबीर यांच्या वकिलांनी केला.
त्यावरून न्यायमूर्तींनी वकिलांची कानउघाडणी केली आहे. ‘तुमचा व्यवस्थेवर किती अविश्वास आहे ते पाहा.
याचिकाकर्ते पोलीस आयुक्त होते. परंतु, आम्ही त्यांना कोणतीही विशेष वागणूक देणार नाही. ते संरक्षण मागत आहेत.
कोर्टानं अटकेपासून संरक्षण दिल्यावरच ते भारतात प्रकट होतील, असं तुम्हाला म्हणायचं आहे का?’, असा प्रश्न न्या. कौल यांनी विचारला आहे.

 

Web Title :- Supreme Court on Parambir Singh | wheres mumbai former CP param bir singh supreme court no relief mumbai ex cp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO-LIC | एलआयसीचा प्रीमियम भरण्यासाठी येत असेल आर्थिक अडचण तर EPFO अ‍ॅडव्हान्समधून भरू शकता रक्कम, जाणून घ्या कसा करावा अर्ज

Anil Deshmukh | सर्वोच्च न्यायालयानं अनिल देशमुखांची तपासाबाबत ‘ती’ मागणी करणारी याचिका फेटाळली; माजी गृहमंत्र्यांच्या अडचणीत वाढ?

Monalisa In Blue Bikini | निळ्या रंगाच्या बिकनीमध्ये मोनालीसाचा ‘हाॅट’ आणि सेक्सी अंदाज; फोटो झाले व्हायरल