Supreme Court On TV Channels Debates | वृत्त वाहिन्यांवरील ’डिबेट शो’ द्वेष पसरवण्याचे सर्वात मोठे माध्यम; SC कडून सरकारची कानउघडणी, मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार

नवी दिल्ली : Supreme Court On TV Channels Debates | टीव्ही वृत्तवाहिन्यांवरील डिबेट शो हे द्वेष पसरवण्याचे सर्वात मोठे माध्यम असल्याचे महत्वाचे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले. टीव्ही चॅनेल्सच्या चर्चेच्या मजकुरावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला (Central Government) जाब विचारला आहे. सरकार हे सर्व मूकदर्शन म्हणून पाहत असून याला छोटी गोष्टी समजत आहे, अशी कानउघडणी न्यायालयाने केली आहे. (Supreme Court On TV Channels Debates)

 

 

न्यायमूर्ती केएम जोसेफ (Justice KM Joseph) आणि हृषिकेश राय (Hrishikesh Rai) यांच्या खंडपीठाने टीव्ही चर्चेचे नियमन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा आपला इरादा बोलून दाखवला. तसेच केंद्र सरकार या विषयावर काही कायदा आणणार आहे का, अशी विचारणा केली.

द्वेषातून टीआरपी येतो आणि टीआरपीमधून नफा येतो, याकडे खंडपीठाने लक्ष वेधले.
तसेच यासंदर्भात मार्गदर्शक तत्व जारी करण्याचे संकेत न्यायालयाने दिले.
जोपर्यंत सरकार या संदर्भात कायदा करत नाही तोपर्यंत मार्गदर्शक तत्वांचा वापर
करण्यात यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

 

Web Title :- supreme court tv channels chief medium of hate speech Supreme Court
On TV Channels Debates central government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा