Supreme Court | 31 जुलैपर्यंत वन नेशन, वन रेशनकार्ड योजना लागू करा; SC चे राज्यांना आदेश

पोलीसनामा ऑनलाइन – देशातील कोरोना संकटाच्या (Corona Crisis) पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 29) वन नेशन, वन रेशनकार्ड (One Nation One Ration Card ) योजनेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महत्वपूर्ण निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टानं देशातील सर्व राज्यांना 31 जुलैपर्यंत वन नेशन, वन रेशनकार्ड योजना (One Nation One Ration Card Scheme)
लागू करण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court) न्यायाधीश अशोक भूषण (Judge Ashok Bhushan) यांच्या खंडपीठाने याबाबतचा आदेश दिला आहे.

Dehu Road News | देहुरोड सवाना चौकातुन निगडी कडे जाणारा सर्व्हीस रोड सर्व वाहनांकरीता बंद करण्यात येणार

वन नेशन, वन रेशनकार्ड (One Nation One Ration Card ) या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सुप्रिम कोर्टाने 31 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. जेणेकरुन प्रवासी मजुरांना देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात या योजनेचा लाभ घेता येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. कोरोनामुळे स्थलांतरीत कामगारांच्या सोयी-सुविधांसंदर्भात संबंधित राज्य सरकारांना यावेळी सुप्रीम कोर्टाने  उत्तम नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. प्रवासी मजुरांना अन्नधान्य उपलब्ध करुन देण आणि त्याच्यासाठी कम्युनिटी किचन’ यापुढील काळातही सुरु ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

हे देखील वाचा

CM ठाकरे स्वत: कार चालवत पोहोचले रिलायन्स हॉस्पिटलमध्ये, रुटीन चेक-अपनंतर पुन्हा घरी

…म्हणून इस्रायलच्या दूतावासानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं केलं मराठीतून अभिनंदन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Supreme Court | one nation one ration card supreme court sets july 31 deadline states implement scheme

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update