Supreme Court Order To Modi Government | ‘कोरोना’ मृतांच्या कुटुंबियांना 60 दिवसांत मदत द्या, सर्वोच्च न्यायालयाचे मोदी सरकारला आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supreme Court Order To Modi Government | कोरोनाच्या महामारीत (Corona Epidemic) अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनामुळे मृत्यू (Death) झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाना 50 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, अद्याप अनेक कुटुंबांना मदत मिळालेली नाही. यावरून सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मोदी सरकारला (Modi Government) आदेश जारी केले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना (Relative) मिळणारी 50 हजार रुपयांची मदत दोन महिन्यात देण्यात यावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. ही मदत केंद्र सरकारकडून दिली जाते. (Supreme Court Order To Modi Government)

 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांचा अर्ज आल्यानंतर, त्या अर्जाची पडताळी करुन मदत पोहचेपर्यंतचा कालावधी सुप्रीम कोर्टाने निश्चित केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Coron Second Wave) मृतांची संख्या आणि आलेले अर्ज (Application) यामध्ये बरीच तफावत असल्याने केंद्र शासनाने अर्जाची पडताळणी करावी असेही निर्देश केंद्र सरकारला देण्यात आले आहेत. (Supreme Court Order To Modi Government)

याबाबत अर्ज करताना संबंधीत नातेवाईकांनी तीन महिन्याच्या आत अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र (Maharashtra), केरळ (Kerala), गुजरात (Gujarat), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) या चार राज्यातून आलेल्या अर्जांमध्ये आणि आलेल्या अर्जांमध्ये तफावत असल्याचे निरीक्षण केंद्राने नोंदवले आहे. 28 मार्च 2022 पर्यंत मृत्यू झालेल्या कुटुंबियांनी 60 दिवसात अर्ज करायचा आहे. त्यानंतर मात्र 90 दिवसांपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

 

महाराष्ट्रात राज्य सरकारने (Government of Maharashtra) कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना अर्ज करण्यासाठी पोर्टल तयार केले आहे.
या पोर्टलवर मृत व्यक्तीचे नातेवाईक अर्ज करु शकतात.
महाराष्ट्र शासनाने mhacovid19relief.in या लिंकवर जाऊन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

 

Web Title :- Supreme Court Order To Modi Government | person who died by corona their relative will get benefit in 60 days

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा