हैदराबाद एन्काऊंटरच्या ‘न्यायालयीन’ तपासाचे आदेश, 6 महिन्यात चौकशी पुर्ण करण्याचा SC चा आदेश

नवी दिल्ली : वृत्त संस्था – हैद्राबादममधील महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार आणि जिवंत जाळल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ४ आरोपी पोलिस एन्काउंटरमध्ये ठार केले. मात्र पोलिसांच्या या थेट कारवाईवर मानवाधिकार आयोग आणि अनेक संघटनांनी प्रश्न उपस्थित केले होते. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश बोबडे म्हणाले की, ‘या चकमकीचे सत्य जाणून घेण्याचा लोकांना अधिकार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च नायायालयाने दिलेल्या सूचनेनुसार, सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश व्ही. एस. सिरपूरकर हे या तीन सदस्यीय समितीचे अध्यक्ष असतील. पुढील आदेश येईपर्यंत अन्य कोणतेही कोर्ट किंवा प्राधिकरण या प्रकरणाची चौकशी करणार नाही. तसेच या प्रकरणाची चौकशी ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

या एन्काउंटर प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बोबडे म्हणाले की, आम्हाला त्याबाबत निष्पक्ष चौकशी हवी आहे. तसेच, आपण पोलिसांविरोधात फौजदारी खटला चालवल्यास आम्ही त्यासंबंधी कोणतेही आदेश जारी करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सरन्यायाधीशांनी या प्रकरणी तेलंगणा सरकारतर्फे बाजू मांडणारे वकील मुकुल रोहतगी यांना सांगितले की, आपण दोषी आहात असे आम्ही म्हणत नाही, मात्र, आम्ही चौकशीचे आदेश देऊ आणि आपण त्यास सहकार्य करावे.

या प्रकरणी, सरन्यायाधीशांनी विचारले की, आरोपी हे हिस्ट्रीशीटर होते का? यावर वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, नाही ते लॉरी चालक आणि क्लिनर होते. जेव्हा पोलिस प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांना घटनास्थळी घेऊन जाण्याच्या तयारीत होते तेव्हा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमा झाला. म्हणून आम्ही (पोलिसांनी) त्यांना रात्री घटनास्थळी आणले. आरोपींना हातकड्या लावण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांनी संधीचा फायदा घेत पोलिसांचे पिस्तूल हिसकावत आणि दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांना ही थेट कारवाई करण्यात आली.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/