Supreme Court | काळ्या कोटपासून हवा दिलासा ! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, उन्हाळ्यात वकिलांना दिलासा देण्याची विनंती

नवी दिल्ली : Supreme Court | सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) एक याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालय आणि देशभरातील उच्च न्यायालयांत उन्हाळ्याच्या हंगामात वकिलांना काळा कोट आणि काळ्या गाऊनमधून सूट देण्याची विनंती केली आहे.

याचिकेत विनंती केली आहे की, स्टेट बार कौन्सिलला निर्देश द्यावेत की, त्यांनी आपल्या नियमात दुरूस्ती करून संबंधित राज्यांत उन्हाळ्याच्या दिवसात वकिलांना काळा कोट आणि गाऊन घालण्यापासून सूट द्यावी. सर्वोच्च न्यायालयात ही याचिका वकील शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी दाखल केली आहे.

याचिकेत म्हटले आहे की, उन्हाळ्यात वकिलांना काळा कोट घालून एका कोर्टातून दुसर्‍या कोर्टात
जाण्यात खुप त्रास होतो. वकिलांचा ड्रेस कोडचा नियम अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्ट 1961 च्या अंतर्गत बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमातून संचालित होतो.

यामध्ये वकीलांसाठी कोर्टात सादर होताना काळा कोट, सफेद शर्ट आणि गळ्यात सफेद फित लावणे अनिवार्य आहे. नियमानुसार वकिलांसाठी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात सादर होतानाच गाऊन घालणे अनिवार्य आहे.

हे देखील वाचा

Gold Price Today | आज ‘स्वत’ झाले सोने-चांदी, जाणून घ्या किती घसरण झाली किमतीत?

Pune News | मंदिरे उघडण्यासाठी भाजप पुन्हा आक्रमक ! कसबा गणपतीसमोर शंखनाद, राज्यात सर्वत्र आंदोलन (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Supreme Court | plea in sc seeking exemption for lawyers from wearing black coats gowns during summer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update