देशभरात मुहर्रम जुलूसला परवानगी देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, म्हणाले – ‘एका समाजाला ‘कोरोना’बद्दल दोष देवू लागतील लोक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाने शिया धर्मगुरू मौलाना कल्बे जव्वाद यांना देशभरात मोहरमची मिरवणूक काढण्यास परवानगी दिली नाही. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती एस.ए. बोबडे यांनी त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, राज्यातील परिस्थिती लक्षात घेता उच्च न्यायालय परवानगी देईल. मौलाना कल्बे जव्वाद यांनी याचिका दाखल करून देशभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये मोहरमची मिरवणूक काढण्यास परवानगी मागितली होती.

प्रत्येक राज्यात वेगळी परिस्थिती
सध्या करोनामुळे धार्मिक मिरवणूका काढण्यास परवानगी नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, संपूर्ण देशात मिरवणूक काढण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, कारण सर्वत्र परिस्थिती वेगळी आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, प्रत्येक राज्याच्या उच्च न्यायालयाने तेथील परिस्थिती लक्षात घेऊन परवानगी दिली पाहिजे. याचिकाकर्त्याने म्हटले की, त्यांना किमान लखनऊमध्ये मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात यावी, कारण बहुतेक शिया समुदायाचे लोक तेथेच राहतात. त्याला उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, त्यासाठी त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात जावे.

जगन्नाथ मिरवणुकीची यासाठी दिली होतो परवानगी
कोर्टाने यापूर्वी ओडिसामध्ये जगन्नाथ यात्रेला परवानगी दिली होती, परंतु न्यायालयाने म्हटले की ते फक्त एका शहराबाबत होते. संपूर्ण देशाबाबत नाही. जर संपूर्ण देशासाठी परवानगी दिली गेली, तर लोक एकाच समुदायाला कोरोनासाठी दोष देऊ लागतील.

कधी आहे मोहरम ?
चंद्राच्या दर्शनासह हा उत्सव २९ किंवा ३० ऑगस्टपासून सुरू होईल. शिया मुस्लिम समाजातील लोक हे दुःख म्हणून साजरे करतात. या दिवशी इमाम हुसेन आणि त्यांच्या अनुयायींची शहादत आठवली जाते. पैगंबर हजरत मोहम्मद साहब यांच्या ७२ साथीदारांच्या शहादतीच्या स्मृतीनिमित्त मोहरम साजली केली जाते.