PMC बँक घोटाळा : खातेधारकांना पुन्हा मोठा धक्का, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेतील (PMC ) घोटाळ्यामुळं अनेक खातेदारांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे. सर्वोच्च न्यायालयात पीएसमी बँक घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेली याचिका न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे तसेच आता उच्च न्यायालयात जा असा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आता पीएमसी खातेधारकांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
Supreme Court refuses to entertain petition, filed by some account holders in the PMC Bank, seeking direction to Reserve Bank of India (RBI) against putting restriction on withdrawal of money. Court asks the petitioners that they may approach concerned High Courts for relief. pic.twitter.com/sIXU1UKX0D
— ANI (@ANI) October 18, 2019
गृहनिर्माण क्षेत्रातील ‘एचडीआयएल’ समूहाशी निगडित कर्जाच्या घोटाळ्यामुळे आर्थिक निर्बंध आलेल्या ‘पीएमसी बँके’चे ठेवीदार अडचणीत आले आहेत. रिझर्व्ह बँकेने सुरूवातीला पैसे काढण्यावर कठोर बंधने आणली होती. याविरोधात खातेधारकांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पण ती याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे.
पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात बँकेच्या अंतर्गत चौकशी समितीने बँकेच्या रेकॉर्डमधून एकूण 10.5 कोटींची रक्कम गायब झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बँकेत झालेला गैरव्यवहार हा 4355 कोटी रुपयांचा नसून, 6500 कोटींहून अधिक असल्याचेही समोर आले आहे. तसेच पीएमसी बँक गैरव्यवहार समोर आल्यानंतर आत्तापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर अली आहे.
Visit : Policenama.com
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या