मराठा आरक्षणाला ‘सर्वोच्च’ दिलासा, तुर्तास स्थगिती नाही 

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती देण्यात येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र २ आठवड्यांनी पुढील सुनावणी होणार आहे.

राज्य सरकारला २ आठड्यात उत्तर देण्याचे निर्देश

मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारकडून उत्तर मागवलं आहे. त्यासंदर्भातील नोटीस सर्वोच्च न्यायालयात सरकारला आपलं म्हणणं २ आठवड्यात सादर करावं लागणार आहे.

२ आठवड्यांनंतर सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती देता येणार नाही असे सांगतानाच राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. तर २ आठवड्यांनंतर याप्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.
मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकले. त्यानंतर उच्च न्यायालयात हे आरक्षण वैध ठरविल्यानंतर ते १६ टक्क्यांऐवजी १२ आणि १३ टक्के असावे असे मत नोंदवले होते. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि इतरांनी आव्हान दिलं आहे. तर मराठा समाजाकडून यासंदर्भात कॅव्हेट दाखल करण्यात आले. आज या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला. त्यामुळे मराठा समाजाला आता दिलासा मिळाला आहे.

 

You might also like