निर्भया केस : दोषींची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालनं फेटाळली, 22 जानेवारीलाच फाशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयात निर्भयाच्या आरोपींनी दाखल केलेली क्यूरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. या दरम्यान सर्वोच्च न्यायलायाने दोन्ही दोषींची क्युरेटिव्ह याचिका फेटाळून लावली आहे.

सर्वोच्च न्यायायलात निर्भया हत्याकांड आणि बलात्कार प्रकरणातील दोन दोषी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह यांनी क्युरेटिव्ह याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी ही याचिका फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे या आरोपांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले आहे.


दिल्ली निर्भया केसवर पटियाला हाऊस न्यायालयाने फैसला सुनावला होता. 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता निर्भयाच्या चारही दोषींना फाशीची देण्यात येणार आहे. निर्भयांच्या गुन्हेगारांच्या विरोधात न्यायालयाकडून डेथ वारंट जारी करण्यात आले होते. या प्रकरणातील गुन्हेगारांच्या शिक्षेच्या याचिकेवर सुनावणी झाली यात हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. 7 जूनला दिल्लीत निर्भयांच्या गुन्हेगारांच्या शिक्षेच्या याचिकेवर सुनावणी झाली होती.

फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर दोषांना 15 दिवसांचा दयेच्या याचिकेचे पर्याय आहे. दरम्यान आरोपींचे वकील अय्यर ए पी सिंग म्हणाले की आम्ही या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करु. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका आज सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता चारही आरोपींना फाशी देण्यात येईल.

फेसबुक पेज लाईक करा –