‘या’ आधारावर सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या ‘राफेल’ संदर्भातील ‘याचिका’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राफेल विमान प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज दाखल असलेल्या तीन याचिकांवर निर्णय देताना त्या फेटाळुन लावल्या. सुप्रीम कोर्टाने या याचिकांवर सुनावणी करताना या याचिकांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. या याचिकाकर्त्यांकडून सादर केलेले पुरावे हे अतिशय कमजोर असून याआधारे कोर्टाने हा निर्णय दिला आहे. या याचिकांमध्ये काहीही तथ्य नसून यामध्ये दिल्या जाणाऱ्या कारणांवर देखील न्यायालय समाधानी नव्हते. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा खटला दाखल करण्याची आवश्यकता नसून कोणत्याही प्रकारच्या चौकशीची देखील गरज नाही.

कुणी दाखल केली होती याचिका –
डिसेंबर 2018 मध्ये सुप्रीम कोर्टात या व्यवहारासंबंधी पुनर्विचार करण्यासाठी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी, प्रशांत भूषण, विनीत भांडा आणि आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांनी तीन याचिका दाखल केल्या होत्या. या तीनही याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने यामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नसल्याचे म्हटले आहे.

चौकशीची गरज नाही –
सुप्रीम कोर्टाने याची सुनावणी देताना म्हटले आहे कि, या प्रकरणी कोणत्याही चौकशीची गरज नसून यामध्ये मोदी सरकारची कोणतीही भूमिका नाही. त्याचबरोबर या याचिकांमध्ये कोणताही दम नसल्याचे देखील कोर्टाने म्हटले. कोर्टाने दिलेला हा निकाल मोदी सरकारसाठी मोठा दिलासा असून काँग्रेसने यावरून मोठे रणकंदन माजवले होते.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like