सर्वोच्च न्यायालयाकडून ई-कोर्ट मोबाइल मॅन्युअल अ‍ॅप लॉन्च; मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह 14 भाषांमध्ये उपलब्ध, जाणून घ्या

नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाच्या ई-कमेटीने आपल्या मोफत ई-कोर्ट सेवा मोबाइल अ‍ॅपसाठी एक मॅन्युअल जारी केले आहे. हे अ‍ॅप्लिकेशन 57 लाखांपेक्षा जास्तवेळा डाऊनलोड करण्यात आले आहे आणि चांगल्या वापरासाठी मॅन्युअल 14 भाषा- म्हणजे इंग्रजी, हिंदी, असामी, बांगला, गुजराती, कन्नड़, खासी, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगुमध्ये जारी केले आहे.

मोबाइल अ‍ॅप आणि त्याचे मॅन्युअल इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये ई-कमेटी, सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत वेबसाइटवरून डाऊनलोड करता येऊ शकते. एससी ई-कमेटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचूड यांनी मॅन्युअल जारी केले. त्यांनी या मोफत आणि नागरिक-केंद्रीत मोबाइल अ‍ॅपच्या वापराबाबत म्हटले की, मागील एक वर्षापासून महामारीने अधिवक्ते, न्यायाधीश आणि वादींनी लॉकडाऊन आणि सार्वजनिक आरोग्य चिंतेच्या दरम्यान कार्यालये आणि न्यायालये बंद असल्याने उच्च तंत्रज्ञान अवलंबले पाहिजे.

ई-कोर्ट सेवा मोबाइल अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून कुणीही व्यक्ती विविध नागरिक-केंद्रीत सेवा जसे की, विविध केसचा केस नंबर, सीएनआर नंबर, फायलिंग नंबर, पार्टीची नावे, एफआयआर नंबर, अधिवक्ता माहिती, अधिनियम इत्यादीद्वारे सर्च करू शकतात. तारीखवार केस डायरीसह फायलिंगपासून निपटारापर्यंत प्रकरणाची पूर्ण केस हिस्ट्री प्राप्त केली जाऊ शकते. कुणीही मोबाइल अ‍ॅपद्वारे, प्रकरणाच्या स्थानांतराची माहिती, अंतरिम अर्जाच्या स्थितीबाबत माहिती जाणून घेवू शकतात. ई-कोर्ट सेवा मोबाइल अ‍ॅप्लिकेशनद्वारे कुणीही हायकोर्ट आणि जिल्हा न्यायालयांच्या प्रकरणांची माहिती प्राप्त करू शकतात. ’माय केस’मधून कुणीही व्यक्तिगत केस नंबर टाकू शकतो आणि स्वयंचलित अपडेट प्राप्त करू शकतो.