जुन्या नोटा चलनात दाखवा, राज्यातील जिल्हा बँकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नोटबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने नाशिकसह राज्यातील इतर बँकांचे आर्थिक व्यवहार गोठवले होते. कालांतराने निर्बंध उठवले, मात्र त्या काळात बँकेत जमा झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांची रक्कम ही तोट्यात दाखवण्याची सूचना नाबार्डने जिल्हा बँकांना केली होती. त्यामुळे आर्थिक अडचणीत असणाऱ्या बँकांचा पाय अधिकच खोलात गेला होता. या निर्णयाविरुद्ध जिल्हा बँकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाने नाशिकसह राज्यातील आठ जिल्हा मध्यवर्ती बँकांना दिलासा दिला आहे. तोट्यात दाखवलेले एकूण ११२ कोटी रुपये तोट्यात न दाखवता सध्या चलनात दाखवण्याच्या सुचना सुप्रीम कोर्टाने दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा बँकांना दिलासा मिळाला आहे.

नाशिक जिल्हा बँकेची २१ कोटी ३५ लाख रुपयांची रक्कम बँकेत जमा होती. ती रक्कम आज बँकेच्या खात्यात दाखविल्याने बँकेला तूर्तास दिलासा मिळाला आहे. आता पुढील सुनावणीकडे लक्ष लागलं आहे.