कार चोरीची माहिती उशिरा मिळाल्यास ‘इंश्योरन्स क्लेम’ फेटाळता येत नाही, सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही कारणास्तव जर कार चोरीची माहिती देण्यास उशीर होत असेल तर कंपनी या आधारावर दावा डिसमिस करू शकत नाही. विमा हक्क खटल्यातील निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने याबाबत माहिती दिली. कंपनीची याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने सांगितले की, पोलिसांना या प्रकरणाची माहिती त्वरित कळविल्यास वाहन शोधण्याची प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान असेल. वाहन चोरीच्या प्रकरणात विमा कंपनी आणि सर्व्हेअरची भूमिका मर्यादित आहे. म्हणूनच, जर या प्रकरणात पोलिसांना माहिती दिली गेली आणि विमा कंपनीला माहिती देण्यास विलंब झाला तर कंपन्या त्या आधारावर हक्क सांगण्यास नकार देऊ शकत नाहीत.

न्यायमूर्ती एन.व्ही. रमन्ना, आर. सुभाष रेड्डी आणि बीआर गवई यांच्या खंडपीठाने वर्ष 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी सहमती दर्शविली. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, जर वाहन चोरीसंदर्भात माहिती देण्यास उशीर झाल्यास विमा कंपनी दावा करण्यास नकार देत असेल तर ते अधिक तांत्रिक बाब होऊन जाईल. तसेच पोलिसांना याबाबत वेळोवेळी कळविण्यात अशी अट ठेवण्यात आली आहे.

कंपनीने म्हटले आहे की, कमर्शियल व्‍हेईकल्‍स पॅकेज पॉलिसीच्या स्टॅंडर्ड फॉर्ममध्ये हे स्पष्ट केले आहे की वाहन चोरीच्या बाबतीत कंपनीला त्वरित कळविण्यात यावे. जर तसे केले नाही तर कंपनी दावा फेटाळून लावेल.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like