संशय कितीही गडद असला तरी देखील पुराव्याची जागा नाही घेऊ शकत – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, संशयाचा आधार काहीही असला तरी ते कोणतेही पुरावे बदलू शकत नाहीत. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने यावर असे म्हंटलं आहे की, आरोपीवरील आरोप जोपर्यंत सिध्द होत नाही तोपर्यंत निर्दोष मानले जाते. न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने ओडिशा हायकोर्टाच्या एका प्रकरणातील आरोपींना निर्दोष ठरविण्याच्या निर्णयाला या टिप्पणीसह कायम ठेवले.

सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, आरोपी तोपर्यंत निर्दोष, जोपर्यंत त्यावरील आरोप सिध्द होत नाहीत
ओडिशा हायकोर्टाने होमगार्डला शॉक देऊन ठार मारल्याच्या प्रकरणात दोन आरोपींना निर्दोष मुक्त केले होते. खंडपीठाने असे म्हटले आहे की, अशा प्रकरणात पुराव्यांची संपूर्ण श्रेणी असावी जे हे दर्शवते की आरोपीने गुन्हा केला आहे. या मालिकेत कोणतीही शंका नसावी जे आरोपी निर्दोष म्हणून निर्दोष सुटण्याची शक्यता दर्शविल.

खंडपीठाने पुढे म्हटले आहे की, या कोर्टाच्या अनेक न्यायालयीन निर्णयांत हे सांगितलेलं आहेच की, जोपर्यंत भक्कम पुरावा समोर येत नाही तोपर्यंत आरोपीला दोषी म्हणता येत नाही. तसेच केवळ संशय हे पुरावा होऊ शकत नाही. पोस्टमार्टम अहवालात विजेच्या धक्क्याने मृत्यूची पुष्टी केली गेली, परंतु हा हत्या केल्याचा ठाम पुरावा नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे.

रेकॉर्डवरील पुराव्यांचा हवाला देऊन पोस्टमॉर्टम करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले आहे की, मृताला दारूचे व्यवसन होते. कदाचित झोपेत असताना चुकून त्याचा विद्युत वायरला स्पर्श झाला असेल. खंडपीठाने सांगितले की, आरोपींना दोषी ठरविण्यात ते अपयशी ठरले आहेत. या कारणास्तव, त्यांना मुक्त करण्याचा ट्रायल कोर्टाचा निर्णय योग्य आहे. त्यामुळे कोर्टात केवळ संशय असून चालत नसून त्यासाठी सबळ पुरावा असणे आवश्यक आहे. तसेच तो पुरावा अतिशय भक्कम असायला हवा. त्यावरच संशय निर्माण होता कामा नये.

मृताच्या पत्नीने केला होता आरोप
मृताची पत्नी गीतांजली तडू यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असे नमूद केले आहे की, तिचा पती विजय कुमार ताडू चांदबली पोलिस ठाण्यात होमगार्ड म्हणून काम करीत होते. बनबिहारी महापात्रा, तिचा मुलगा लूजा आणि इतरांनी विजयकुमारला विषारी पदार्थ खायला दिले त्यानंतर शॉक देऊन वियकुमारची/पतीची हत्या केली आहे, असा आरोप गीतांजली यांनी केला होता.