Supreme Court | SC चा वकीलांना भरपाई देण्यास नकार; दंड लावून म्हटले – ‘काळा कोट घालणारे सामान्य लोकांपेक्षा वेगळे नाहीत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Supreme Court | भरपाईच्या मागणीसाठी विनंती करणार्‍या वकीलाला सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) संतापाचा सामना करावा लागला. कोर्टाने सक्त ताकिद देत म्हटले की, अशाप्रकारची फसवेगिरी भविष्यात केली जाऊ नये. यानंतर वकील आपली याचिका मागे घेण्यास तयार होता परंतु कोर्टाने ती फेटाळून 10 हजार रूपयांचा दंड लावला.

खंडपीठाने प्रदिप कुमार यादव यांना दंडाची रक्कम एक आठवड्याच्या आत सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनमध्ये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.
यादव यांनी आपल्या याचिकेत केंद्र, बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि अनेक इतर संघटनाना पक्ष बनवले होते.

सुप्रीम कोर्टाने मंगळवारी ती याचिका फेटाळली ज्यामध्ये कोरोनामुळे जीव गमावणार्‍या 60
वर्षापेक्षा कमी वयाच्या वकिलांच्या कुटुंबियांना 50-50 लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली होती.

कोर्टाने म्हटले की, असे म्हणता येणार नाही की, वकीलांचे जीवन इतर लोकांपेक्षा जास्त मौल्यवान आहे. जस्टिस डी. वाय. चंद्रचूड़, जस्टिस विक्रम नाथ आणि जस्टिस बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठाने
म्हटले की, ते वकीलांच्या बनावट जनहित याचिका दाखल करण्यास प्रोत्साहन देऊ शकत नाहीत.

खंडपीठाने म्हटले की, ही याचिका प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे.
तिला एकही प्रासंगिक आधार नाही. कोरोनामुळे असंख्य लोकांचा मृत्यू झाला.
अशा प्रकरणांमध्ये भरपाई वितरणाबाबत मार्गदर्शक तत्त्व बनवण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अगोदरच निर्णय दिला आहे.

 

खंडपीठाने याचिकाकर्ते वकील प्रदीप कुमार यादव यांना म्हटले की, समाजातील इतर लोकांना महत्व नाही का. हे एक पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन आहे.
तुम्ही काळा कोट घातला आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुमचे जीवन इतर लोकांपेक्षा
जास्त मौल्यवान आहे. आम्हाला वकीलांना बनावट जनहित याचिका दाखल करण्यास प्रेरणा द्यायची नाही.

 

Web Title : Supreme Court | sc denies compensation to lawyers imposes fine and said no different from common people wearing black coats

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | संतापजनक ! डिलीव्हरी बॉयची तरुणीवर अश्लील शेरेबाजी, KISS घेण्याचा प्रयत्न

Keto Diet | वजन कमी करणारा हा आहार वाढवतोय ‘कॅन्सर’ आणि हृदयाच्या आजारांचा धोका, जाणून घ्या

AIIMS Nagpur Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! AIIMS नागपूरमध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती, पगार 67 हजार रुपये