महिलांचा मोठा विजय ! लष्करात महिलांनाही समान संधी द्या, SC नं उच्च न्यायालयाच्या निर्णयावर केलं शिक्कामोर्तब, केंद्राला फटकारलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुप्रीम कोर्टानं लष्करातल्या महिलांसाठी आज ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाने लष्करात महिलांसाठी स्थायी कमिशन निर्माण करा असा आदेश दिला आहे. या अगोदर सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला होता. मात्र केंद्राने तांत्रिक कारण देत निर्णय दिला नव्हता. महिलांच्या प्रश्नांवर मानसिकता बदलणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. समानतेच्या मुद्यावरून केंद्राने हा निर्णय दिला असून केंद्राला फटकारलं आहे. महिलांच्या प्रश्नांवर मानसिकता बदलणं गरजेचं आहे त्यामुळे महिलांच्या स्थायी कमिशनचा मार्ग मोकळा झालाय. या निर्णयाने लष्करामध्ये महिलांबाबत जी कोंडी निर्माण झाली होती ती फुटण्यासाठी मदत होणार आहे.

कोर्टाने असे म्हटले आहे की, महिलांना त्यांचा अधिकार मिळालाच पाहिजे. कमांड पोस्टिंग हि महिलांना देता येणार नाही. शत्रू राष्ट्र याचा फायदा उठविण्याची शक्यता आहे. हे काम महिला अधिकाऱ्यांना कितपत झेपेल याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.

कोर्टाने केंद्राचे हे सर्व तर्क फेटाळून लावले आहेत. समानता आणायची असेल तर महिलांना ही समान अधिकार दिलेच पाहिजेत. त्यांच्या क्षमतेवर शंका उपस्थित करू नका तर आपल्या विचारात बदल करा असं केंद्र सरकारला कोर्टाने फटकारलं आहे.

महिलांना लष्करात महत्त्वाच्या आघाड्यांवर पोस्टिंग देण्यावरून गेली अनेक वर्ष शंका निर्माण केली जात आहे. 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचं नेतृत्वही महिला अधिकाऱ्याने केलं होतं. गेल्या काही वर्षात लष्कारात अनेक विभागांमध्ये महिलांना प्रवेश देण्यात येत होता. प्रशासकीय स्वरुपाचीच कामं महिला अधिकाऱ्यांना जास्त देण्यात येत होती. पण आता हे सर्व थांबणार असून आघाडीवरही नियुक्ती होणार आहे.