…स्फोटक आणून सगळ्यांना एका झटक्यात मारून टाका : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये प्रदूषणाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने संतप्त प्रतिक्रिया देत प्रदूषणाचा एवढा त्रास सहन करण्यापेक्षा सर्वांना १५ बॅग्ज स्फोटके आणून उडवून टाका. लोकांना गॅसवर रहायला भाग का पाडता ? लोकांना या सर्वांचा त्रास होत आहे, अशा शब्दात न्यायालयाने महाधिवक्ता तुषार मेहता यांना सुनावले आहे.

बाहेरील देशातील लोक आपल्यावर हसत आहेत, कारण आपण पेंढा जाळण्यावर देखील नियंत्रण ठेऊ शकत नाही. प्रदूषणाला गांभीर्याने न घेता आपण लोक दोषारोप खेळण्याचा प्रयत्न करत आहोत असे मत न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी व्यक्त केले आहे.

तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, प्रत्येक व्यक्तीला किती लाख रुपये द्यावे ? दिल्ली नरकापेक्षा वाईट आहे. भारतात आयुष्य सोपे नाही असे सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला सांगितलेले आहे.

आम्हाला प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार या सत्ताकेंद्रांमुळे अडचण निर्माण होते असे मत दिल्लीचे मुख्य सचिव यांनी न्यायालयात व्यक्त केले. यावर सुप्रीम कोर्टाने दिल्ली आणि केंद्र सरकारला एकत्रित बसून आगामी दहा दिवसात प्रदूषणावर निर्णय घेण्यासाठी योजना आखण्याचे निर्देश दिले आहेत.

Visit : Policenama.com