सुशांत सिंह मृत्यू प्रकरणानंतर ‘या’ प्रकरणात सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला फटकारलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत कथित आत्महत्या प्रकरणानंतर आता सुप्रीम कोर्टानं दुसऱ्याच दिवशी पालघर लिंचिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला फटकारलं आहे. चूक करणाऱ्या पोलिसांवर तुम्ही कोणती कारवाई केली ? असा सवाल करत सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारची कानउघडणी केली आहे.

काय आहे प्रकरण ?
चोर असल्याच्या अफवेतून प्रवास करणाऱ्या तिघांची जमावाने निर्घृण हत्या केली. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात 16 एप्रिल रोजी रात्री हा प्रकार घडला होता. यात दोन साधूंसह एका चालकाचा समावेश होता. जमावाने तिघांवर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी बघ्यांची भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणात तीन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या हल्ल्यात सुशीलगिरी महाराज (वय-30) चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (वय-70 रा. कांदिवली आश्रम) व चालक नीलेश तेलगडे (वय-30) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

दुसरीकडे, सुप्रीम कोर्टात बुधवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी झाली. बिहारमध्ये नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये रियाविरुद्ध गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला चौकशी अहवाल पुढील तीन दिवसात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात सर्व बाजू आपल्या लेखी उत्तरांत देण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत. यानंतर सुप्रीम कोर्टात आपला निर्णय देईल. कोण चौकशी करेल आणि कुठले राज्य करणार यावर निर्णय देईल. बिहार पोलिसांविरोधात तुम्ही कसे वागले याचे उत्तर द्या. पोलिसांविरोधात चौकशी अहवाल मागितला आहे. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला रेकॉर्डवरही आरोपपत्रे आणण्याचे आदेश दिले आहेत.पुढील सुनावणी 3 आठवड्यानंतर होणार आहे.