Supreme Court | कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई का दिली नाही? महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना (Corona) काळात लोखो रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. अनेकदा या कोरोना मृतांच्या (corona death) कुटुंबीयांना नुकसान भरपाई (Compensation) देण्याची मागणी केली गेली. यातच आता कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई न दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महाराष्ट्र (Maharashtra), राजस्थान (Rajasthan) आणि पश्चिम बंगालसह (West Bengal) अनेक राज्यांना फटकारले आहे.

 

महाराष्ट्र सरकारला फटकारले
सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राज्य सरकारांना कोविड मृतांच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई न देण्याबाबत मानवी भूमिका घेण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीला आतापर्यंत नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही, हे हास्यास्पद आहे. महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर आम्ही अजिबात खूश नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

 

कोरोना मृतांच्या माहितीसाठी ऑनलाइन पोर्टल (Online portal) सुरु करण्यात आले आहे. याबाबत बोलताना न्यायालयाने (Supreme Court) म्हटले की, महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक मृत्यू झाले आणि 37 हजार जणांनी ऑनलाइन नोंदणी केल्या. परंतु आजपर्यंत एकाही व्यक्तीला नुकसान भरपाई मिळालेली नाही. यानंतर महाराष्ट्र सरकारचे वकील सचिन पाटील (Lawyer Sachin Patil) यांनी लवकरच याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येईल असे न्यायालयात सांगितले.

इतर राज्यांनाही फटकारले
पश्चिम बंगालमध्ये 19 हजाराहून अधिक मृत्यू झाले आहेत. मात्र 467 अर्ज प्राप्त झाले आहेत.
तर आतापर्यंत 110 जणांना नुकसान भरपाई दिली आहे. राजस्थानमध्ये 9 हजार मृत्यू झाले असून केवळ 595 अर्ज आले आहेत.
मात्र, अद्याप कोणालाही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही.
उत्तर प्रदेशात 22 हजार लोकांचा मृत्यू झाले, 16,518 अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 9,372 जणांना भरपाई मिळाली आहे.

 

पुढील सुनावणी 10 डिसेंबरला
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 डिसेंबरला होणार आहे.
मागील महिन्यात केंद्र सरकारने (Central Government) न्यायालयाला दोन आठवड्यांत ऑनलाइन पोर्टल तयार करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
याद्वारे कोविड-19 मुळे जीव गमावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून नुकसानभरपाईचा दावा केला जाऊ शकतो.

 

Web Title :- Supreme Court | supreme court angry over non payment compensation corona deaths family slams several states

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 518 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्यात ‘या’ कारणामुळं झाला समीरवर बेछुट गोळीबार ! भरदिवसा ‘मर्डर’ करणार्‍याचा पर्दाफाश, पोलिसांकडून एकाला अटक

Rajesh Tope | आता RTPCR चाचणी 350 रुपयांत, खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती