×
Homeताज्या बातम्याSupreme Court | स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका लांबणीवर पडणार! सुप्रीम कोर्टाने सुनावणी...

Supreme Court | स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका लांबणीवर पडणार! सुप्रीम कोर्टाने सुनावणी टाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) लांबणीवर पडल्या आहे. सुप्रीम कोर्टातली (Supreme Court) सुनावणी लांबणीवर पडली आहे. 92 नगरपरिषदांमध्ये ओबीसी आरक्षण (OBC Reservation), प्रभाग रचना याबाबत आज कोर्टात (Supreme Court) निर्णय होणे अपेक्षीत होते. मात्र तसा निर्णय आजच्या सुनावणीत होऊ शकला नाही. तसेच मुंबई महानगरपालिकांच्या (Mumbai Municipal Corporation) प्रभाग रचनेचा विषयही लांबणीवर पडला आहे.

 

आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण याशिवाय मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग रचनेची (Ward Composition) सुनावणी होणार होती. यासंदर्भातल्या जवळपास 28 याचिका सूचीबद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र या याचिकांवर आज सुनावणी होऊ शकली नाही. या याचिकांवर आता दसऱ्यानंतर सुनावणी होणार आहे.

 

न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड (Justice Dr. Dhananjaya Chandrachud) आणि
न्यायमूर्ती हिमा कोहली (Justice Hima Kohli) यांच्या खंडपीठापुढे (Bench) ही सुनावणी पार पडणार होती.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) घेतलेल्या प्रभाग संख्येनुसार होणार,
की शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) केलेल्या प्रभाग संख्येनुसार होणार, यावर या याचिकेमध्ये निर्णय होणार आहे.

मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात जेव्हा सुनावणी होत होती,
त्यावेळी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लांबणीवर का पडत आहेत,
असा सवाल करत कोर्टाने चिंता व्यक्त केली होती. पावसाळ्यात निवडणुका घ्या,
असे देखील आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. परंतु आज प्रकरण यादीत असून देखील यावर सुनावणी झाली नाही.
त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
निवडणुका लांबणीवर पडल्याने प्रशासकांचा कालावधी वाढवावा लागणार आहे.

 

Web Title :- Supreme Court | supreme court elections in local bodies likely to be delayed hearings in the supreme court postponed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; 1 लाख 62 हजारांची अफुची बोंडे (चुरा) जप्त

District Planning Committee (DPC) Pune | अजित पवारांना धक्का? पुणे जिल्हा नियोजन समितीवरील 18 सदस्यांचे पद रद्द

Pankaja Munde | ‘…तर मोदीही मला संपवू शकत नाही’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विधानसभेचा दाखला देत बंधू धनंजय मुंडे म्हणाले…

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News