Supreme Court | देशमुख आणि परमबीर सिंह यांच्यातील वादावर ‘SC’ ने व्यक्त केली चिंता

x
Supreme Court | Supreme court expresses concern over fight between former home minister anil deshmukh and former mumbai cp param bir singh
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी घेण्यात आली. यावेळी आपण भारतातच असून 48 तसांत CBI समोर हजर होण्यास तयार असल्याचे सिंह यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सांगितले. त्यानंतर न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि परमबीर सिंह यांच्यात सुरु असलेल्या वादावर चिंता (Expresses Concern) व्यक्त केली.

 

अनिल देशमुख आणि परमबीर सिंह यांच्यात सुरु असलेल्या वादावर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) चिंता व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणी आम्हाला वेगळं चित्र दिसत असून देशमुख आणि सिंह यांच्यातील लढाई (fight) अधिक उत्सुकतेची बनल्याचे न्यायालयाने म्हटले. परमबीर सिंह आणि संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्यात झालेल्या संवादावर देखील न्यायालयाने टिप्पणी केली आहे. पोलीस आयुक्त (Police Commissioner) अशा जबरी कारवाया करत असतील तर सामान्य नागरिकांचे काय होत असेल? तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) करणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

परमबीर सिंह यांच्या वकिलांनी कोर्टात (Supreme Court) सांगितले की, परमबीर यांच्या जीवाला धोका असल्यामुळे ते समोर आलेले नाहीत.
परमबीर सिंह कुठे आहेत हे समजत नाही, तो पर्यंत खंडणी प्रकरणात (Ransom case) अटकेपासून संरक्षण दिले
जाणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने मागच्या सुनावणीत स्पष्ट केलं होतं.
परमबीर सिंह चंदीगड (Chandigarh) येथे असल्याची त्यानंतर ते बेल्जियमला (Belgium) निघून गेल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा होती.

 

Web Title :- Supreme Court | Supreme court expresses concern over fight between former home minister anil deshmukh and former mumbai cp param bir singh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nawab Malik In Dubai | वानखेडेंवर आरोप करणारे नवाब मलिक अचानकपणे दुबई दौऱ्यावर का गेले?

PM Awas Rules | ‘पीएम आवास’चे नियम बदलले : करू नका ही चूक अन्यथा योजनेच्या लाभापासून राहाल वंचित

Google Latest Security Update | गुगलचं नवीन अपडेट, ‘या’ स्टेप्सने करा आपले Google अकाऊंट आणखी सुरक्षित

Sameer Wankhede | वानखेडे कुटुंबाचंही फोटोतून प्रत्युत्तर; म्हणाले – ‘आईसाठी मुस्लिम पद्धतीने लग्न, आम्ही धर्मनिरपेक्ष भावनेचं पालन करतो’

Narendra Patil | ‘ठाकरे सरकारच्या गंभीर चुकांमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले’ – नरेंद्र पाटील

Sapna Choudhary | सपना चौधरीनं पुन्हा एकदा सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, डान्सचा ‘हा’ व्हिडीओ झाला व्हायरल

Total
0
Shares
Related Posts