Supreme Court | लवकरच लागणार NEET चा निकाल; उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केला रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supreme Court | कोरोनाच्या पार्श्वभुमीवर NEET परीक्षा (NEET 2021 Result) लांबणीवर पडली. त्यानंतर नुकतच NEET परीक्षा २०२१ मध्ये घेण्यात आली. या परिक्षेत काही संस्थाकडून घोटाळा करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. यावरुन मुंबई उच्च न्यायालयानं परीक्षेचा निकाल राखून ठेवण्यात यावा असे, आदेश दिले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) याबाबत आदेश रद्द केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court) एनटीएला निकाल रोखून ठेवण्यास सांगितलं होतं आणि परीक्षेचा प्रयत्न करताना अडचणी आलेल्या 2 विद्यार्थ्यांसाठी पुन्हा वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यास सांगितलं होतं. मात्र, 2 विद्यार्थ्यांसाठी इतर सर्व विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवणं अमान्य असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आदेश रद्द करत NEET चा निकाल (neet latest news) लवकरच जाहीर करण्यात यावा असे आदेश दिले आहेत. 16 लाख विद्यार्थी आहेत जे निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे आम्ही नोटीस जारी करू आणि हाय कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देऊ. एनटीए ना निकाल लवकरात लवकर जाहीर करावा, असं सर्वोच्च न्यायलयानं म्हटलं आहे.

 

न्यायमूर्ती एल नागेश्वर राव, संजीव खन्ना आणि बीआर गवई यांच्या खंडपीठाने
मुंबई उच्च न्यायालयाचे निर्णयाविरुद्ध एनटीएच्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली.
त्याचबरोबर, दिवाळीनंतर दोन विद्यार्थ्यांचे काय होईल ते आम्ही ठरवू.
दरम्यान, आम्ही नोटीस जारी करतो आणि काउंटर दाखल करतो.
मात्र, आम्ही 16 लाख विद्यार्थ्यांचे निकाल रोखू शकत नाही, असं खंडपीठानं सांगितलं आहे.

 

Web Title :- Supreme Court | supreme court overruled order of mumbai high court about neet result result declare as soon as possible

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Uddhav Thackeray | ‘लोकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करावा यासाठी केंद्र सरकारकडून इंधन दरवाढ’

Pune Corporation | गणेश बिडकर यांचा जगताप यांच्यावर ‘हल्लाबोल’; सभागृह नेते म्हणाले – ‘प्रशांत जगताप यांना तुरूंगाची हवा खावून आलेल्या नेत्यांकडून कोणता सत्संग घडतो’ (व्हिडीओ)

BMC Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी भरती; 1 लाख 25 हजार रुपये मिळणार पगार