Supreme Court | ठाकरे सरकारला ‘सुप्रीम’ झटका ! भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Supreme Court | इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावर केंद्राकडून एम्पिरिकल डेटा (Empirical Data) मिळावा यासाठी पावसाळी अधिवेशानावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी गोंधळ माजवला होता. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना (BJP MLA) एका वर्षांसाठी निलंबित (Suspended) करण्यात आलं होतं. यानंतर हा विषय थेट सुप्रीम कोर्टात (Supreme Court) गेला. दरम्यान, आज सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला (Thackeray Government) एक मोठा झटका बसला आहे.

महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आलेल्या भाजप आमदारांना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षाचे निलंबन असंवैधानिक आणि मनमानी ठरवून रद्द केले. पिठासीन अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं होतं. दरम्यान, कोर्टाने हा निर्णय असंवैधानिक असल्याचं सांगत निलंबन रद्द केलं आहे. तर, आमदारांना अधिवेशनाबाहेर निलंबित करण्याचा ठराव ‘असंवैधानिक’, ‘बेकायदेशीर’ आणि ‘विधानसभेच्या अधिकारांच्या पलीकडे’ आहे, असं न्यायालयाने नमुद केलं आहे.

‘या’ आमदारांचं झालं होतं निलंबन –

1. गिरिश महाजन (Girish Mahajan)

2. संजय कुटे (Sanjay Kute)

3. अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar)

4. आशिष शेलार (Ashish Shelar)

5. पराग आळवणी (Parag Aalavani)

6. योगेश सागर (Yogesh Sagar)

7. राम सातपुते (Ram Satpute)

8. नारायण कुचे (Narayan Kuche)

9. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar)

10. बंटी भांगडिया (Bunty Bhangdiya)

11. हरिष पिंपळे (Harish Pimple)

12. जयकुमार रावल (Jaykumar Rawal)

Web Title : Supreme Court | supreme court quashes one year suspension from the maharashtra legislative assembly of 12 bjp mla

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या