Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान (Rainy Convention) विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये घातलेल्या गोंधळ याप्रकरणी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन (BJP 12 MLA Suspended) केले होते. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात देखील ही कारवाई मागे घेतली नाही. दरम्यान, या प्रकरणी भाजपच्या 12 निलंबित आमदारांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली होती. दरम्यान या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) या निर्णयावरुन राज्य सरकारवर (Maharashtra Government) कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.

12 आमदारांच्या निलंबन प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दिवसभर झालेल्या युक्तिवादात सुप्रीम कोर्टाने या कारवाईवर कडक ताशेरे ओढले आहेत. आमदारांचं निलंबन हा सर्वस्वी सभागृहाचा निर्णय असला तरी 60 दिवसांपेक्षा अधिक काळासाठी ते करता येणार नाही, असं कोर्टाने आपल्या निरीक्षणात म्हटले आहे.

12 आमदारांवर झालेली निलंबनाची कारवाई ही बरखास्तीपेक्षा जास्त कडक असल्याचे मत कोर्टाने नोंदवलं. दरम्यान, निलंबनाच्या कारवाईत कोर्ट सहसा ढवळाढवळ करत नाही. हा सभागृहाचा अधिकार असतो, असा युक्तीवाद महाराष्ट्र सरकारच्यावतीने (Government of Maharashtra) करण्यात आला. मात्र, या कारवाईत केवळ आमदारांनाच नव्हे तर घटनात्मक मूल्यांनाही शिक्षा होत असल्याचे मत सुप्रीम कोर्टानं नोंदवत कडक टिप्पणी केली. आता भाजपच्या 12 निलंबित आमदारांच्या याचिकेवर पुढील सुनावणी 18 जानेवारी रोजी होणार आहे.

 

निलंबन झालेल्या आमदारांची नावे

1. गिरीश महाजन (Girish Mahajan), जामनेर, जळगाव

2. आशिष शेलार (Ashish Shelar), वांद्रे पश्चिम

3. डॉ. संजय कुटे (Dr. Sanjay Kute), जळगाव जामोद

4. अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar), औसा, लातूर

5. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar), कांदिवली पूर्व, मुंबई

6. पराग अळवणी (Parag Alvani), विलेपार्ले, मुंबई

7. राम सातपुते (Ram Satpute), माळशिरस, सोलापूर

8. हरीश पिंपळे (Harish Pimple), मूर्तिजापुर, अकोला

9. जयकुमार रावल (Jayakumar Rawal), सिंदखेडा, धुळे

10. योगेश सागर (Yogesh Sagar), चारकोप, मुंबई

11. कीर्तिकुमार भांगडिया (Kirtikumar Bhangdiya), चिमूर, चंद्रपूर

12. नारायण कुचे (Narayan Kuche), बदनापूर, जालना

 

 

Web Title :- Supreme Court | supreme court sternly criticizes suspension 12 bjp mlas maharashtra assembly mahavikas aghadi government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

 

Covid-19 Mild Symptoms | एम्सच्या (AIIMS) डॉक्टरांकडून जाणून घ्या कशाप्रकारे रूग्ण घरीच करू शकतात ‘कोरोना’च्या हलक्या लक्षणांवर आपला उपचार

 

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ