Supreme Court | सर्वोच्च न्यायालयाचा भाडेकरुंना मोठा दिलासा, भाडे न भरणे हा गुन्हा नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाडे (Rent) न भरणे हा भारतीय दंड संहितेअंतर्घत दंडनीय गुन्हा (Crime) नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) एका प्रकरणात दिला आहे. संबंधित प्रकरणामध्ये घरमालकाने भाडेकरू विरोधात एफआयआर (FIR) दाखल केला होता. तो एफआयआर रद्द करत न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) या निकालामुळे भाड्याने राहणाऱ्या अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

या प्रकरणामध्ये भादंवि कलम 415 अन्वये फसवणूक (Cheating) केल्याच्या गुन्ह्यासाठी आणि कलम 403 अंतर्गत गैरवापर केल्याच्या गुन्ह्यासाठी नोंदवलेला एफआयआर रद्द करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) नकार दिला होता. त्या निकालाविरोधात दाखल झालेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली.

 

न्यायालयाने म्हटले की, जर भाडेकरुने काही अडचणींमुळे भाडे भरले नाही तर तो गुन्हा होत नाही. तसेच याप्रकरणी भादंवि कलमांतर्गत कोणतीही शिक्षा नाही, असेही कोर्टाने निकालामध्ये नमूद केले आहे. हा निकाल नीतू सिंग (Neetu Singh) विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार (Government of Uttar Pradesh) यांच्याशी संबंधित आहे. या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ति संजीव खन्ना (Justice Sanjeev Khanna) आणि न्यायमूर्ति बेला एम त्रिवेदी (Justice Bella M Trivedi) यांच्या खंडपीठासमोर (Bench) झाली.

 

तक्रारीत दिलेले तथ्य खरे असले तरी हा गुन्हा ठरत नाही असे आमचे मत आहे.
भाडे न भरल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, मात्र आयपीसीअंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार नाही.
तसेच तशी परिस्थितीही नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित एफआयआर रद्द केला आहे.

 

Web Title :- Supreme Court | the supreme court has given a big relief to the non paying tenants

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा