Supreme Court To Ajit Pawar NCP | सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला महत्वाचे निर्देश; म्हणाले – ‘शरद पवारांचा फोटो, व्हिडिओ वापरू नका’

Supreme Court To Ajit Pawar NCP | Supreme Court's important instructions to Ajit Pawar group; Said - 'Don't use Sharad Pawar's photo, video'

दिल्ली: Supreme Court To Ajit Pawar NCP | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात (Sharad Pawar NCP) राजकीय संघर्ष सुरु आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने घड्याळ चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पाळले जात नसल्याचा आरोपही यामध्ये करण्यात आला होता.

यानंतर या याचिकेवर ७ नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पडली होती. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी अजित पवार गटाला घड्याळ चिन्हाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याबद्दल ३६ तासांत वृत्तपत्रांत जाहिरात देण्याचे आदेश दिले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयात आज (दि.१३) पुन्हा सुनावणी पार पडली.

आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला काही निर्देश दिले आहेत. यामध्ये शरद पवारांचे फोटो आणि व्हिडिओ वापरू नका असे तोंडी आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय तुम्ही तुमच्या पायावर उभं राहायला हवं, अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील कुठल्याही सदस्याने शरद पवारांचे फोटो आणि व्हिडिओ वापरू नयेत असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे.

शरद पवार गटाकडून अजित पवार गटावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत असल्याचा आरोप करण्यात आला. अभिषेक मनु सिंघवी यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी हे शरद पवारांचे फोटो लावल्याचे निदर्शनास आणले.

त्यावर अजित पवार यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील बलबीर सिंग यांनी आरोप फेटाळून लावले, हे फेक आहे असे सांगितले त्यावर सिंघवी यांनी प्रत्युत्तर दिले की, हा व्हिडिओ अमोल मिटकरी यांच्या अधिकृत हँडलवरून पोस्ट करण्यात आला होता.

Total
0
Shares
Related Posts