सर्वोच्च न्यायालय उद्या देणार ‘राफेल’ आणि ‘सबरीमाला मंदिर’ प्रकरणावर निर्णय

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयात 14 डिसेंबर 2018 ला 36 राफेल विमानांच्या कराराच्या विरोधात दाखल याचिकांवर निर्णय होणार आहे. राफेलचा मुद्दा लोकसभा निवडणूकीवेळी चांगलाच तापला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. आता सर्वोच्च न्यायालय 14 डिसेंबरला म्हणजेच उद्या या प्रकरणावर सुनावणी करुन निर्णय कळवेल. राफेलच्या विरोधात समीक्षा याचिकेवर हा निर्णय सुनावण्यात येईल.

याशिवाय सर्वोच्च न्यायालयात सबरीमाला मंदिराच्या प्रकरणावर देखील निर्णय सुनावण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयात सबरीमाला मंदिरात सर्व वयाच्या महिलांना प्रवेशास परवानगी देण्यात येऊ नये यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या निर्णयांच्या विरोधात समीक्षा याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या आपला निर्णय देईल.

हे दोन्ही निर्णय माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर सुनावण्यात येईल अशी शक्यता होती. परंतू आता हे दोन्ही निर्णय देशाचे नवे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर सुनावण्यात येतील. 4 दिवसांपूर्वीच नुकतेच माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने अयोध्या प्रकरणाचा अंतिम निकाल दिला होता. हा निकाल शनिवारी सुनावण्यात आला. कारण रविवारी 10 तारखेला सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची निवृत्ती होती. रंजन गोगोई यांच्या निवृत्तीनंतर शरद बोबडे यांच्याकडे सरन्यायाधीश पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Visit : Policenama.com