‘अयोध्या’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा ‘निकाल’ उद्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील ऐतिहासिक निकाल उद्याच लागण्याची शक्यता आहे. रामजन्मभूमी संबंधित निकाल उद्या येणार आहे. उद्या सर्वोच्च न्यायालाय हा निकाल सुनावणी करणार आहे. हा ऐतिहासिक निर्णय न्यायालयाला सुट्टी असताना होणार आहे. उद्या सकाळी 10.30 वाजल्यापासून सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल वाचण्यास सुरुवात होईल. कोर्ट कचेरींचा इतिहास असलेल्या अत्यंत जुन्या प्रकरणाचा उद्या निकाल लागेल.


अयोध्येप्रकरणी उद्या निकाल येणार असल्याने सर्व राज्यात सतर्केचा इशारा देण्यात आला आहे. गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना यासंबंधित निर्देश दिले आहेत. अतिगर्दीच्या ठिकाणी, धार्मिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. उत्तर प्रदेशात देखील चोख बंदोबस्त करण्यात आला आहेत. 40 दिवस 5 ऑगस्ट पासून रोज या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनवाणी सुरु आहे. अखेर उद्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय यावर निर्णय सुनावेल. ही सुनावाणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडून होणार आहे. आता निकाल काय लागणार यावर चर्चा सुरु झाली आहे.

अयोध्येच्या विवादावरुन सर्वोच्च न्यायालयात निर्णय होणार असल्याने अयोध्या प्रशानस सतर्क झाले आहे. पंच कोसी परिक्रमेसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे, अयोध्येवर ड्रोनने नजर ठेवली जाणार आहे. अयोध्येप्रकरणी अनेक शांततेच्या संदेश देणाऱ्या समित्या तयार करण्यात आल्या आहेत. या समितीतील लोक विविध जिल्ह्यात गावा गावात जाऊन शांततेचा आणि प्रेमाचा संदेश देतील. अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवर अस्थायी तुरुंगाचा निर्माण करण्यात आला आहे. शाळांना आणि खासगी इमारतींना अस्थायी तुरुंगात रुपांतरीत करण्यात आले आहे. अयोध्येत सर्व दल तैनात करण्यात आले आहेत.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like