खा. सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची ‘ऑफर’ नव्हती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्ता नाट्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र, शरद पवार यांनी एका न्युज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मोदींच्या भेटीदरम्यान काय घडले हे सांगितले. त्यावेळी त्यांनी मोदींनी सुप्रिया सुळे यांना मंत्रीपदाची ऑफर दिल्याचे म्हटले होते. मात्र, आता एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ऑफर दिली नसल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती. तुमच्यासोबत काम करण्यास मला मनापासून आनंद होईल, असे मोदींनी सांगितलं होतं. तसेच सुप्रिया सुळेंनाही मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यास मला आनंद होईल, असे पवारांनी एका न्युज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. पण, मी त्यांना सांगितलं एकत्र काम करण राजकीयदृष्ट्या मला शक्य नाही. मला भाजपनं राष्ट्रपती पदाची ऑफर देलेली नव्हती, हे काही खरं नाही, माझ्या मनातही तसं नव्हतं, असे शरद पवारांनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. तसेच सुप्रिया सुळेंच्या मंत्रिपदाचा प्रश्न विचारला असता, त्यावर पवारांनी घडलेला प्रसंग सांगितला. तसेच मोदींकडून थेट ऑफर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

मोदींनी सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिली होती का ? यावर उत्तर देताना, नाही… नाही… म्हणत पवारांनी घडलेला प्रसंग सांगितला. सुप्रिया सुळे चांगलं काम करत असून गेल्या 5 वर्षात त्या उत्कृष्ट संसदपटू आहेत. तुमच्यासोबत त्यांचा वेळ वाया नाही घालवला पाहिजे असे (जोक्स ऑफ द पार्ट) मोदींनी मला म्हटलं होतं. त्यांनी आपला वेळ वाया घालवू नये, त्यांच्या कामाचा उपयोग देशपातळीवर होईल, असे मोदींनी आमच्या भेटीदरम्यान म्हटल्याचे शरद पवारांनी सांगितले.

Visit : Policenama.com