पक्ष सोडून जाणाऱ्यांनो सांभाळून रहा : खा. सुप्रिया सुळे

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – सगळीच रसायनं चांगली नसतात. जगात रसायनं बॅन होत आहेत. त्यामुळे पक्षातून जाणाऱ्यांनो तुम्ही पण सांभाळून रहा. ते रसायनांची पावडर तुमच्यावर टाकत आहेत. त्यामुळे रसायनातून काय होतं हे तुम्ही पाहिले आहे. रसायनापासून सांभाळून रहायला पाहिजे, मी तर राहते, असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना दिला आहे. नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये पडझड सुरु आहे. अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याकडे गेले की नेते स्वच्छ होतात अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. यावर प्रत्युत्तर देताना भाजपाकडे वॉशिंग पावडर नाही तर डॅशिंग केमिकल असल्याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

रसायनाचा विकास पाहिजे की आमचा ?
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी एक सायन्स स्टुडंट आहे. सगळीच रसायनं चांगली नसतात. आजकाल शेतकरी पण रसायन नको, किटकनाशकं नको म्हणतात. महिला रसायनं असल्याने भाज्यादेखील नको म्हणतात. त्यामुळे तुम्हाला यांच्या रसायनाचा विकास पाहिजे की आम्ही केलेला विकास पाहिजे याचा विचार करायची वेळ आली असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like