Supriya Sule | सुप्रिया सुळेंचे भाजप, मनसेवर टीकास्त्र, म्हणाल्या – ‘छत्रपतींवर छोटे सिनेमे सहन नाही करणार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा मेळावा शेळकेवाडी येथे पार पडला. या कार्यक्रमाला राष्टवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुलेंवर केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. शिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास मांडणारे चित्रपट सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) दिला.

 

‘राज्यपालांनी शिवाजी महाराज आणि महात्मा फुलेंवर केलेल्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करते.
भाजपामधील एकाही नेत्याने त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला नाही, म्हणजे भाजपला ही वक्तव्ये मान्य आहेत.
‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटातून चुकीचा इतिहास मांडला जात आहे.
शिवाजी महाराजांवर काढलेले खोटे सिनेमे सहन करणार नाही.’ असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

 

हर हर महादेव आणि वेडात वीर दौडले सात या चित्रपटांविरोधात भाजप व मनसेने प्रतिक्रिया दिली नसल्याने
या दोघांना शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही.
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी बदला घेत असल्याचे स्पष्ट सांगितले आहे,
त्यामुळे ते सुडाचे राजकारण करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

 

Web Title :- Supriya Sule | fake movies on chhatrapati will not be tolerated ncp mp supriya sule at mulshi taluka of pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Minor Girl Rape Case | पुण्यात माजी सरपंचाचं घृणास्पद कृत्य, अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार

Uddhav Thackeray Group | ‘मातोश्री’चं किचन सांभाळते म्हणणार्‍या बाईला वैतागले म्हणत महिला नेत्याचा ठाकरेंना रामराम

Pune Crime | आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या कोरेगाव पार्क येथील ‘पब्लिक रेस्टॉरंट अँड बार’वर गुन्हे शाखेची कारवाई