दौंड रेल्वेला उपनगराचा दर्जा द्या, खा.सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – पुणे रेल्वे विभागाअंतर्गत दौंड रेल्वेस्थानकाला उपनगराचा दर्जा देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज शुक्रवारी लोकसभेत केली. याबरोबरच लोणावळा ते पुणे ते दौंड दरम्यान लोकल सेवा सुरू करून दौंड-पुणे-लोणावळा या लोहमार्गाचे चौपदरीकरण करावे, असेही त्या म्हणाल्या.

महसूलवाढीकरीता रेल्वे विभागाने जाहीरातींकरीता निश्चित केलेल्या जागा, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसह रेल्वे खात्यासाठीचा संपुर्ण निधी खर्च करण्याच्या मुद्द्याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधत बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड, बारामती, नीरा रेल्वे स्थानकांचे प्रश्न मांडले. याबरोबरच पुणे लोणावळा या लोहमार्गाचे चौपदरीकरण करण्याची मागणी केली.

लोकसभेत भाषण करताना सुळे यांनी रेल्वे मंत्रालयाच्या २०१९-२० वर्षाकरीता अनुदानाची मागणी करून दरम्यान प्रवाशांसाठी दौंड ते लोणावळा मार्गावर रेल्वेसेवा सुरू करणे आणि महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एमआरआयडीसी) मुख्यालय पुण्यात स्थापन करण्याचाही पुनरुच्चार केला.
दौंड रेल्वेस्थानका लगतच्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तो प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी सुळे यांनी पुन्हा एकदा केली आहे.

बारामती आणि निरा रेल्वेस्थानकांचे सुशोभीकरण करणे आणि नुतनीकरणासोबतच पुणे ते दौंड मार्गावर सहजपूर आणि कासुर्डी ही नवी रेल्वेस्थानके सुरू करावीत त्यासोबतच बारामती मतदारसंघातील दौंड तालुक्यातील पाटस येथे रेल्वेस्थानकावर पादचारी उड्डाणपुल उभारणी करावी, बारामती, दौंड आणि भिगवण येथील प्रवाशांसाठी स्वतंत्र आरक्षित जागांचा कोटा द्यावा तसेच सर्व गाड्यांचा थांबा दौंड रेल्वेस्थानकावर देण्याची मागणी त्यांनी केली. बारामती रेल्वेस्थानकासमोरील मोकळी जागा भाडेतत्वावर देऊन नागरिकांसाठी सेवारस्ता सुरू करावा. याशिवाय शिर्सुफळ गावातील गावडे वस्ती ते सोनबा पाटील वस्तीला जोडणाऱ्या रस्त्यालगतच्या बांधकामांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणीही शेवटी सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली

बुलेट ट्रेनसाठी करावयाच्या भूसंपादनाची माहिती द्या
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादन करावे लागणार. त्याची सविस्तर माहिती आणि ज्यांच्या जमिनी घेतल्या जातील त्यांना मोबदला कसा देणार याची माहिती द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. रेल्वे खात्याच्या निधीसंदर्भात चर्चेदरम्यान बोलताना त्यांनी रेल्वेमंत्र्यांनी ही माहिती द्यावी, असे त्या म्हणाल्या.

आरोग्यविषयक वृत्त –

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून