Supriya Sule | ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही’, सुप्रिया सुळेंनी दाखवला कोर्टाचा निकाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि समर्थ रामदास स्वामी (Samarth Ramdas Swami) यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन (Statement) नव्या वादाला तोंड फुटले आहे. राजकीय वर्तुळातून याबाबत प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) यावर आक्षेप नोंदवला आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या (Aurangabad Bench) निकालाची प्रत ट्विट करुन राज्यपालांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.

 

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक ट्विट करुन मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) खंडपीठाने दिलेल्या एका निकालाचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 16 जुलै 2018 रोजी दिलेल्या निकालानुसार, तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ (Historian) आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार (Evidence) छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

जिजामाता शिवाजी महाराजांच्या गुरु
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण ? हे शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं… रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता (Rajmata Jijamata) होत्या. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडविले हे जिजामातांच्या संस्कारांनी… त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते. काही लोकांच्या हातात लेखणी होती, त्यामुळे कर्तृत्वसंपन्न महामानवाला रामदासांनी घडवले अशी लेखणीची कमालकृत्ये केली, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तसेच शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते नसल्याचे देखील कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

काय म्हणाले भगतसिंह कोश्यारी ?
महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय (Chanakya) चंद्रगुप्ताला (Chandragupta) कोण विचारेल,
समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल ? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही.
प्रत्येकाच्या मागे आईचे मोठे योगदान असते, तसेच आपल्या समाजात गुरुचे मोठे स्थान असते.
शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटले की तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे,
अशा आशयाचे विधान राज्यपाल भगतिसंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात बोलताना केले होते.

 

Web Title :-  Supriya Sule | ncp leader and mp supriya sule reaction over governor statement on chhatrapati shivaji maharaj and samarth ramdas swami

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा