Supriya Sule | ‘बायको जेवढी रुसून बसत नसेल, तेवढे हे मंत्री रुसत आहेत’ – सुप्रिया सुळे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाल्यानंतर बरेच दिवस रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाला. यानंतर खाते वाटप जाहिर करण्यात आले. यामध्ये महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे आली आहेत. कमी महत्त्वाची खाती मिळाल्यामुळे अनेक मंत्री नाराज असल्याचे म्हटले जात आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार (NCP MP) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारला (State Government) मिश्कील टोला लगावला आहे. घरातील बायको एवढी रुसत नसेल तेवढे हे मंत्री रुसत आहेत, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

 

अडीच वर्षात आमची सत्ता गेली. पुढील अडीच वर्षानंतर निवडणुका (Election) लागतील.
मात्र, सध्या शिंदे-भाजप (BJP) यांच्या संयुक्त सरकारमधील मंत्र्यांमध्ये रुसवे-फुगवे आहेत.
घरात बायको जेवढी फुगत नसेल तेवेढे हे मंत्री फुगत आहेत, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.
त्या एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

 

हे मंत्री नाराज असल्याची चर्चा

मंत्रीपद मिळूनही कमी महत्त्वाची खाती मिळाल्यामुळे काही मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे.
यामध्ये शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar),
रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) तसेच सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे, अशी चर्चा आहे.
नाराजीच्या चर्चेनंतर या मंत्र्यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

 

Web Title : – Supriya Sule | ncp leader and mp supriya sule tauts eknath shinde group over cabinet allocation of cm eknath shinde devendra fadnavis government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा