Supriya Sule | सुप्रिया सुळेंचे गोपीचंद पडळकर यांना प्रतिउत्तर; म्हणाल्या – ‘तुम्हाला माझा उद्धटपणा वाटेल, पण,…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule | आज (दि.१९) मतदारसंघातील विविध प्रश्नांवर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याशी भेटून चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी (Supriya Sule) पवार कुटुंबावर गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) केलेल्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले.

 

शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) आणि पार्थ पवार (Parth Pawar)  यांच्या एकत्रित फोटोवरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी पवार कुटुंबावर टीका केली होती. त्यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, ‘आमच्या घरच्यांविषयी बोलल्याशिवाय बातमी होतचं नाही. तुम्हाला माझा उद्धटपणा वाटेल, पण तुम्हाला हात जोडून म्हणते की, तो माझा उद्धटपणा नाही. त्यामुळे मी प्रांजळपणे सांगते. आमच्या घरातील कोणाचा तरी कोणा सोबत फोटो असेल आणि त्याची बातमी होत असेल तर होऊ द्या. चॅनेल पण बिझी राहतील आणि त्यांना पण पब्लिसिटी मिळते. एवढं तरी माणसानं दिलदार असलं पाहिजे.’ असा टोला त्यांनी यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांना लगावला.

भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी पार्थ पवार आणि शंभूराज देसाई यांच्या भेटीवर भाष्य केले होते. यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले होते की, ‘पार्थ पवार यांचा लोकसभा निवडणूकीत अडीच लाखांच्या मतांनी पराभव झाला. राजकीय स्थिरता मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत असतील. घरात आजोबांकडून अन्याय होत असल्याने, न्याय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.’ असा टोला गोपीचंद पडळकरांनी पवार कुटुंबियांना लगावला होता.

 

पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांचा शासकीय बंगला पावनगड येथे जाऊन शंभूराज देसाई यांची भेट घेतली आहे.
तेव्हा १५-२० मिनीट त्या दोघांमध्ये चर्चा झाली.
ही भेट खासगी कामासाठी घेतल्याचे पार्थ पवार यांनी स्पष्ट केले.

 

 

 

Web Title :- Supriya Sule | NCP leader mp supriya sule answer to gopichand padalkar statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा