Supriya Sule | ‘महाराष्ट्र सरकार कर्नाटकपुढे दुर्बल’ – सुप्रिया सुळे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकातील बेळगाव हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उठले आहेत. पुण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वारगेट बस स्थानकात कर्नाटकच्या गाड्यांना काळे फासले तसेच ‘जय महाराष्ट्र’ लिहून गाड्या रवाना केल्या. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी कर्नाटकच्या या मुजोरीवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी राज्य सरकारलादेखील धारेवर धरले आहे. या असल्या घटनेनंतर महाराष्ट्र सरकार काय करत आहे? महाराष्ट्राचे राज्यकर्ते एवढे दुर्बल झाले आहेत का?, असे प्रश्न सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपस्थित केले.
कर्नाटकमधील ट्रकवर दगडफेकीच्या घटनेनंतर महाराष्ट्र सरकार काय करत आहे? महाराष्ट्राचे राज्यकर्ते एवढे दुर्बल झाले आहेत का? त्यांचे राज्यातील प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली पाहिजे. बेळगावमधून काही मराठी भाषिकांचे फोन येत आहेत. त्यांच्या घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्रात भाजपच्या विचारांचे सरकार आहे. यावर केंद्र सरकारने तातडीने लक्ष घालायला हवे, अशा मागण्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यावेळी केल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघराज्यांच्या ऐक्याची भूमिका मांडली होती. पण, आज त्यांच्या महापरिनिर्वाणदिनी देशात विविध वाद होत आहेत. ही मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारकडे पाहत आहोत. त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. राज्य सरकार नेहमीच केंद्रापुढे शेपूट घालत आहे. राज्यातील उद्योग गेले तेव्हादेखील तेच. आता कर्नाटक सीमाप्रश्नावरदेखील तेच. आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्यावर दोन मंत्र्यांनी आपला पूर्वनियोजित दौरा रद्द केला, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
Web Title :- Supriya Sule | NCP MP supriya sule on shinde government over stone pelting maharashtra truck karnatak border
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
SSC HSC Exam | सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आता 50 रुपये; शिक्षण मंडळाचा निर्णय
Ramdas Athawale | ‘भीमशक्ती प्रकाश आंबेडकरांसोबत नसून माझ्यासोबत’ – रामदास आठवले
Supriya Sule | ‘शरद पवारांनी लाठ्या खाल्ल्या; पण माघार नाही घेतली’ – सुप्रिया सुळे