Supriya Sule | जितेंद्र आव्हाडांनी राजीनाम्याचा विषय डोक्यातून काढून टाकावा – सुप्रिया सुळे

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Police Station) विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रीदा रशिद (Rida Rashid) नामक महिलेने त्यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. रशिद ही महिला भाजपशी (BJP) संबंधित आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी सदर चित्रफीत पाहिली आहे. हा सर्व प्रकार गैरसमजातून झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर विनयभंगाचे आरोप करण्याइतके टोकाचे पाऊल उचलणे योग्य नाही, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातील चित्रफित दोन – तीन वेळा पाहिली. हा प्रकार घडला त्यावेळी आजूबाजूला प्रचंड गर्दी होती. जितेंद्र आव्हाड यांनी त्या गर्दीत खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikan Shinde) यांना देखील हात लावला होता. त्यानंतर त्यांनी संबंधित महिलेला हाताने बाजूला केले. त्या गदारोळात नेमके काय झाले, हे कळत नाही. पण त्यावेळी त्या महिलेवर विनयभंग कसा काय होऊ शकतो? हा प्रकार गैरसमजातून झाला आहे. संबंधित महिलेची देखील बाजू ऐकून घेतली पाहिजे. पण जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे टोकाचे पाऊल उचलने अयोग्य आहे, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

आव्हाडांनी राजीनाम्याचा विषय डोक्यातून काढून टाकावा.
मुंब्रा मतदार संघातील जनतेने जितेंद्र आव्हाड यांना निवडून दिले आहे. ते एक चांगले लोकप्रतिनिधी आहेत.
झालेल्या प्रकारावर आमदारकीचा राजीनामा देणे हा उपाय नाही. आम्ही देखील अनेक कार्यक्रमाला जातो,
तेव्हा अशी गर्दी आणि गदारोळ होतो. मी ‘भारत जोडो’ यात्रेत गेले होते. त्यावेळी काही मुले माझा हात ओढत होती.
आता मी त्याला विनयभंग म्हणायचे का? लोकांचे आपल्यावर असलेले प्रेम असते.
महाराष्ट्रात लोक बंदुकी घेऊन महिलांना शिव्या घालतात, तेव्हा आम्ही त्याला विनयभंग म्हणत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Web Title :- Supriya Sule | ncp mp supriya sule reaction on molestation case filed on jitendra awhad by women during eknath shinde event

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

7th Pay Commission | खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; जाणून घ्या किती

Jitendra Awhad | बचावासाठी जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता मैदानात, म्हणाल्या – ‘… त्याला विनयभंग म्हणता येत नाही’

Neha Malik | “हाय गर्मी…” नेहा मलिकच्या सिझलिंग स्टाइलने चाहते घायाळ, फोटो व्हायरल