Supriya Sule | सुप्रिया सुळे यांचा सणसणीत टोला; म्हणाल्या – ‘शरद पवारांबद्दल बोलताना फडणवीस हे विसरले की…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) व शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर विरोधी पक्षनेते (Opposition Leader) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या खोचक टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यानंतर आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी फडणवीसांना केंद्र सरकारच्या (Central Government) एका निर्णयाची आठवण करुन दिली.

 

शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा केवळ पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे. त्यांनी राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा केली तरी शेवटी राजकारण करायला त्यांना गल्लीतच यावं लागतं. पक्षाचं नाव राष्ट्रवादी ठेवलं म्हणून त्यांचा पक्ष राष्ट्रवादी होत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखतीत म्हटले होते. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले होते की, नव्या पिढीनं शरद पवार यांच्याबद्दल बोलताना तारतम्य बाळगायला हवं.

अजित पवार यांच्या नंतर फडणवीसांच्या टीकेबाबत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना विचारले असता त्यांनी अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया दिली,
फडणवीसांच्याच पक्षाच्या केंद्रातील सरकारकडून शरद पवार यांना पद्म पुरस्कार (Padma Award) दिला गेलाय.
पवार साहेबांबद्दल बोलताना फडणवीस हे विसरले असावेत, अंस सुळे यांनी म्हटलं.

 

किरण मानेंबद्दल बोलणं टाळलं
राजकीय पोस्ट लिहिल्यामुळे ‘मुलगी झाली हो..’ या मालिकेतून बाजूला करण्यात आलेले अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांच्याबद्दल सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी यावर अधिक बोलणं टाळलं.
त्या म्हणाल्या, मीडियातून याबाबत वेगवेगळी माहिती मिळत आहे.
यावर खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) बोलतील.

 

Web Title : Supriya Sule | ncp mp supriya sule taunts bjp leader devendra fadnavis for his comment on ncp chief sharad pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा