मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule | माझ्या भोळेपणाचा त्या नेत्याने फायदा घेतला. खोटेनाटे सांगून पक्ष सोडला. नंतर मी माहिती घेतली असता, त्याने मला उल्लू बनविल्याचे स्पष्ट झाले. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एका यूट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटंल आहे. त्यानंतर हा नेता कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
त्या नेत्याकडून आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेतला गेल्याचे लक्षात आल्यानंतर मला खूप त्रास झाल्याचे यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादीच्या (NCP) कोणत्या नेत्याने खोटे कारण देत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला? सुप्रिया सुळे यांना फसविणारा तो नेता कोण? याची चर्चा सुरू झाली आहे.
एका यूट्युब चॅनेल बरोबर आयोजीत मुलाखतीत सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांना, तुम्हाला आयुष्यात कोणी धोका दिल्याची भावना कधी झाली का? या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘राष्ट्रवादीचा एक नेता, त्याच्या वडिलांप्रमाणे अनेक वर्षे राजकारणात होता. तो आपल्या कुटुंबातील एक सदस्यासारखाच होता. तो नेता राष्ट्रवादी सोडून जाणार असल्याची माहिती मला मिळाली. त्यानंतर मी त्याला फोन केला आणि त्याबद्दल विचारलं. त्यावर तो म्हणाला की, मला अशा-अशा अडचणी येत आहेत. मग मी त्यावर म्हणाले की, तुम्ही घरी या. तुम्हाला ज्या काही अडचणी येत असतील त्यावर विचार करू. पटलं नाही तर तुम्ही सोडून जा.’
दरम्यान, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी बोलावल्यानंतर तो नेता त्यांच्या घरी आला. त्याच्यासोबत तब्बल तीन तास चर्चा झाली. त्यावेळी जर मी भाजपमध्ये गेलो नाही तर माझ्या वडिलांना जेलमध्ये जावे लागेल. आपल्याविरोधात मोठी केस उभी केली जाईल, अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाईल. असं त्या नेत्याने सुप्रिया सुळे यांना सांगितले. पण चर्चा झाल्यानंतर त्यावर विचार करून कळवतो. असं तो नेता म्हणाला. ही गोष्ट २०१९ ची होती. असं देखील यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मात्र, २०१९ नंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर संबंधित खात्यातील मंत्र्याला फोन करून मी त्या केसबाबत माहिती मागविली.
दहा दिवसांनी त्या खात्यातील मंत्र्याचा मला फोन आला. त्या मंत्र्याने मला सांगितले की, या केसची डिटेल्स देता येत नाही,
पण या केसमध्ये काहीच दम नाही. या घटनेनंतर त्या नेत्याने मला फसविल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली.
असं सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.
त्या नेत्याने खोटीनाटी कारण पुढं करत पक्ष सोडला, माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला आणि मला उल्लू बनवलं.
अशा भावना यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या. तो नेता खूप हुशार आहे.
खोट्या केसचं कारण देत त्याने आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेतला. आपल्याला फसवलं.
ही घटना अत्यंत वेदनादायी होती. माझ्यासाठी मित्रत्वाचे संबंध हे सगळ्या गोष्टींहून अधिक महत्वाचं असल्याचे देखील यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्यात २०१९ सालच्या निवडणुकीत अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
आता सुप्रिया सुळे म्हणत असलेला नेता कोण? कारण यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी या नेत्याचे नाव जरी जाहीर केले
नसले तरी, तो नेता आणि त्याचे वडील अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.
अशी माहिती यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. त्यावरून वेगवेगळे अंदाज बांधण्यात येत आहेत.
Web Title :- Supriya Sule | ncp supriya sule interview says one ncp leader took advantage of my naivety betrayed me know who is that leader
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update