Supriya Sule | कवितेच्या माध्यमातून खा. सुळेंचे संभाजी भिडेंवर टीकास्त्र ‘तू लाव टिकली, परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली‘

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Supriya Sule | काल मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांना एका महिला पत्रकाराने प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न केला असता, भिडेंनी तिला म्हटले, तू टिकली लाव. आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री ही भारतमातेचं रूप आहे, आणि आमची भारत माता विधवा नाही. तू आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो. भिडेंच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. सोशल मीडियात भिडेंवर टिकेचा वर्षाव होत आहे. आता भिडेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सुळे यांनी यासाठी एक कविता ट्विट केली आहे.

‘तू आणि मी ….
मी लावतो टिळा
तू लाव टिकली
परंपरेच्या बाजारात
अक्कल आम्ही विकली

मी लावतो भस्म
तू लाव कुंकू
गुलामीचा शंख
दोघे मिळून फुंकू

तू घाल मंगळसूत्र
मी घालतो माळ
मनूने मारलेली रेषा
मनोभावे पाळ

तू घाल बांगड्या
माझ्या हातात गंडा
मुकाट्याने ऐक नाहीतर
आमच्या हातात दंडा

मी घालतो मोजडी
तू जोडवे घाल
सप्तपदी च्या मर्यादेत
जन्मभर चाल

तू घाल अंबाडा
मी शेंडी राखतो
विज्ञानाच्या प्रगतीला
परंपरेने झाकतो

मी घालतो टोपी
तू घाल बुरखा
बायकांच्या गुलामीवर दोन्हीकडे
एकमत आहे बर का…!!!

मी धोतरात, तू शालूत
होऊ परंपरेचे दास
साने गुरुजी ते भिडे गुरुजी
महाराष्ट्राचा प्रवास …..!!!!!
– हेरंब कुलकर्णी‘

खासदार सुप्रिय सुळे (Supriya Sule) यांनी या कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत भिंडेंवर टिकास्त्र सोडले आहेत. हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांची ही कविता आहे. या कवितेत मनूने महिलांसाठी केलेले जाचक नियम विषद केले असून महाराष्ट्राचा प्रवास साने गुरूजी (Sane Guruji) ते भिडे गुरूजी असा अधोगतीकडे चालला असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, काल मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर संभाजी भिडे म्हणाले, मी व्यक्तिगत स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली नाही. भगवंताच्या कृपेने चांगले मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) लाभले. धाडसाने अनेक निर्णय घेतात. प्रत्येक निर्णय उत्कृष्ट घेतले आहेत. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे शिवाजी महाराज (Shivaji Maharaj), संभाजी महाराजांचे (Sambhaji Maharaj) विचार घेऊनच पुढे आले. शिवसेना (Shivsena)-भाजपा (BJP) व्यक्तिगत स्वार्थासाठी वाईट करणार नाही. राम लक्ष्मण एकत्र पाहिजेत. भगवंत त्यासाठी मदत करत आहे. भविष्यात सगळे एकत्र येतील.

Web Title :- Supriya Sule | ncp supriya sule slams sambhaji bhide over his statement on woman

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | दिवाळीनंतर सोने तेजीत तर चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Raj Kundra | पॉर्न फिल्मचा व्यवसाय करतोस का? विचारणाऱ्या ट्रोलरला राज कुंद्राने दिले ‘हे’ उत्तर

Gautami Patil | सांगलीत झालेल्या घटनेनंतर गौतमी पाटीलनी पत्रकार परिषद घेत केला ‘हा’ मोठा खुलासा (VIDEO)