Supriya Sule | सुप्रिया सुळेंनी संसदेत उल्लेख केलेला ‘तो’ भाऊ ‘ती’ बहिण कोण, सर्वत्र चर्चा, म्हणाल्या – बहिणीचं कल्याण…

नवी दिल्ली : Supriya Sule | महिलांच्या हिताचा विचार भावांनी करावा, हे बरोबर आहे. पण प्रत्येक घरात असे भाऊ नसतात, ज्यांना बहिणीचे कल्याण व्हावे असे वाटते. प्रत्येकाचे एवढे चांगले नशीब नसते, असे वक्तव्य आज महिला विधेयकावर संसदेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी केले. खासदार सुळे यांच्या बोलण्याचा रोख कोणत्या भावावर होता, त्यांनी अमित शहांनाच (Amit Shah) हे का ऐकवले, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

मंगळवारी लोकसभेत (Lok Sabha) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महिला आरक्षण विधेयक (Women’s Reservation Bill) मांडले. या विधेयकावर आज काँग्रेसकडून (Congress) सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी प्रथम आपली भूमिका मांडली. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पक्षाचे मत मांडले. दरम्यान, भाजपाकडून (BJP) या विधेयकावर बोलण्यासाठी सर्वप्रथम पुरुष सदस्य निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांना संधी देण्यात आली. यावर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Congress leader Adhir Ranjan Chaudhary) यांनी आक्षेप घेतला.

अधीर रंजन म्हणाले, महिला आरक्षणावर बोलण्यासाठी भाजपाकडून पुरुष मंडळींना सर्वात आधी संधी दिली जात आहे. यावरून गृहमंत्री अमित शाह अधीर रंजन यांना उद्देशून म्हणाले, महिलांच्या मुद्द्यांवर फक्त महिलांनीच बोलावे का? महिलांच्या प्रश्नांवर पुरुष बोलू शकत नाहीत का? भावांनी महिलांच्या हिताचा विचार करणे आणि त्यावर बोलणे ही या देशाची परंपरा आहे.

अमित शहा यांच्या याच वक्तव्याचा पुरेपुर आधार घेत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या,
महिलांच्या हिताचा विचार भावांनी करावा, हे बरोबर आहे. पण प्रत्येक घरात असे भाऊ नसतात,
ज्यांना बहिणीचं कल्याण व्हावं असं वाटतं. प्रत्येकाचं एवढं चांगलं नशीब नसतं.

सुप्रिया सुळे यांनी नेमकी ही खंत कोणत्या बहिणीविषयी आणि कोणत्या भावाविषयी व्यक्त केली याबाबत आता चर्चा
सुरू झाली आहे.

दरम्यान, महिला विधेयकावर बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या, महिला आरक्षण विधेयक हे माझे पती राजीव गांधी
यांचे स्वप्न होते. या सरकारने हे स्वप्न आता लवकरात लवकर पूर्ण करावे. तर सुप्रिया सुळे म्हणाल्या,
महिला आरक्षण विधेयक आणण्यासाठी सर्वात आधी पंतप्रधान राजीव गांधी यांनी प्रयत्न केले.
महाराष्ट्रात माझे वडील शरद पवार (Sharad Pawar) यांनी सर्वप्रथम पंचायत राज निवडणुकीत महिला आरक्षण लागू केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police | गणेश भक्तांसाठी पुणे पोलिसांकडून ‘गणेशोत्सव 2023 डिजिटल रोड मॅप’ लाँच (व्हिडीओ)

Supriya Sule | अजित पवारांचा अपमान करण्यासाठी सोबत घेतलं का? पडळकरांच्या विधानावरुन सुप्रिया सुळेंचा भाजपला थेट सवाल