Supriya Sule On Ajit Pawar | बारामतीच्या विजयानंतर अजित पवारांबद्दल प्रश्न, सुप्रिया सुळेंचे मोजक्याच शब्दात उत्तर…

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Supriya Sule On Ajit Pawar | अतिशय प्रतिष्ठेची ठरलेलया बारामती लोकसभेच्या निवडणूकीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली आहे. विविध एजन्सीकडून प्राप्त झालेल्या एक्झिट पोल नुसार सुळे यांना ही निवडणूक जड जाणार असे वाटत होते. मात्र आज मतमोजणी होऊन निकाल हाती आला आहे. यामध्ये बारामतीचा गड राखण्यात सुप्रिया सुळेंना यश आले आहे. (Baramati Lok Sabha)

विजय मिळवल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा निवडणुकीच्या विजयाबाबत प्रश्न विचारण्यात आले यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी राम कृष्ण हरी असे म्हंटले. यानंतर अजित पवार यांच्याबाबत देखील सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी पुन्हा एकदा राम कृष्ण हरी असे म्हंटले.(Supriya Sule On Ajit Pawar)

“बारामतीच्या सर्व मतदारांचे मी आभार मानते, मला असं वाटतं की संघर्ष, आयुष्यात कधीही खचून जायचं नाही हे कुणापासून शिकायचं असेल तर शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून शिकते. गेले दहा अकरा महिने केसं गेलं हे सर्वांनी पाहिलं आहे. लोकांनी साथ दिली आता जबाबदारी वाढलीय. झालं गेलं आता गंगेला वाहिलं “, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“निवडणुकीच्या काळात महाराष्ट्राची संस्कृती जपण्याची जबाबदारी सर्वांवर असते,कार्यकर्ता आमच्यासोबत उभा राहिला,
हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे “, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. मात्र यावेळी सुप्रिया सुळे यांनी
अजित पवारांवर बोलण्याचे टाळले असल्याचे दिसून आले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitish Kumar | नितीश कुमारांना थेट उपपंतप्रधानपदाची ऑफर?; राजकीय हालचालींना वेग

Hadapsar Pune Crime News | पुणे : नातेसंबंधातील प्रेमप्रकरणाला विरोध, प्रेयसीचा खून करुन प्रियकराची आत्महत्या

Murlidhar Mohol | माझा विजय गिरीश बापट यांना समर्पित! मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रीया