Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Supriya Sule On Chandrakant Patil | सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची परवानगी दिल्याने महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलं आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Political Reservation Maharashtra) मुद्द्यावरून भाजप (BJP) महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) टिकेची झोड उठवत आहे. मध्य प्रदेश सरकारला जे जमलं, ते महाराष्ट्र सरकारला का नाही ? असा प्रश्न भाजपकडून उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आज मोर्चे काढत निषेध व्यक्त केला आहे. यादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या वक्तव्यावर उत्तर देत टीका केली आहे. (Supriya Sule On Chandrakant Patil)

”ओबीसी आरक्षणासंदर्भात आपण एकत्र लढायचे असे ठरले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले. दोन दिवसांत असं काय त्या सरकारने केले आणि दिल्लीत बैठक झाली आणि त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला (Central Government) विचारणार आहे,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं. यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. (Supriya Sule On Chandrakant Patil)

चंद्रकांत पाटलांनी त्यांना स्वयंपाक करण्याचा सल्ला दिला. “तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या,” असे ते म्हणाले.

दरम्यान, यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “आमचं सरकार दडपशाहीचं नाही.
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना असं वाटत असेल की त्यांनी माझ्या विधानावर बोलावं, तर तो त्यांचा अधिकार आहे.
त्यात गैर काय आहे?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर त्यांना वाटलं, ते बोलले.
मी त्याचा इतका काही विचार करत नाही आयुष्यात,” अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title : Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule
mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त