Supriya Sule On CM Eknath Shinde | ‘डॉ. दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य पणाला लावले, त्यामुळे महत्वाच्या पदावर असणाऱ्यांनी श्रद्धा ठेवली पाहिजे, अंधश्रद्धा नाही’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Supriya Sule On CM Eknath Shinde | प्रत्येकाची देवावर श्रद्धा असते. श्रद्धेवर आमचा सर्वांचा विश्वास आहे. पण अंधश्रद्धेवर नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहेत. त्यांनी अंधश्रद्धेविरोधात खूप मोठे काम या राज्यात आणि देशात उभे केले, असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कथित भविष्य पाहण्याच्या कृतीवर भाष्य केले आहे. (Supriya Sule On CM Eknath Shinde)

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी दौऱ्यावर असताना, सिन्नरमध्ये जाऊन ज्योतिषाकडून भविष्य बघितल्याच्या चर्चा सध्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हे चुकीचे केले, अशी प्रतिक्रिया सध्या महाराष्ट्रात आणि विरोधी पक्षांतून उमटत आहे.

 

यावर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या की, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आपले आयुष्य पणाला लावले.
महत्वाच्या पदावरील लोकांनी श्रद्धा ठेवली पाहिजे. पण, महाराष्ट्रात अंधश्रद्धेवर एक वेगळे मत आहे,
असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक टीका करणे मात्र टाळले.

 

Web Title :- Supriya Sule On CM Eknath Shinde | ncp mp supriya sule reaction on chief minister eknath shinde visit to sinnar ishaneshwar temple

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gulabrao Patil On Aditya Thackeray | ‘आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरले असते तर त्यांना बिहारमध्ये जाण्याची वेळ आली नसती’

MLA Pratap Sarnaik | शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांकडून तुळजाभवानीच्या चरणी 75 तोळे सोने अर्पण

FIFA World Cup 2022 | पेलेनंतर स्पेनचा गॅवी ठरला विश्वचषकात गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू

Maharashtra Politics | पाच महिने होऊनही आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी लटकलेलीच; कायद्यात वेळेचे बंधन नसल्याने विधानसभेच्या अध्यक्षांचा वेळ काढूपणा?