Supriya Sule On Devendra Fadnavis | “दोन पक्ष फोडल्याचा कसला अभिमान बाळगता”, सुप्रिया सुळेंचा सवाल; म्हणाल्या – ” धमक्यांचा काळ गेला, महिला लाटणे घेऊन मागे लागतील”

Supriya Sule On Irrigation Scam Maharashtra | waiting for elections to end then case will be filed against devendra fadnavis supriya sule direct warning about rr patil file case

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule On Devendra Fadnavis | महाविकास आघाडीचे भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मोशीत आयोजित महिला मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ‘दाेन पक्ष फाेडल्याचा कसला अभिमान बाळगता’, असा सवाल सुळे यांनी केला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या ४० आमदारांना प्रत्येकी ५० काेटी रुपये दिले, असे दाेन हजार काेटी रुपये खर्च करून सरकार पाडले. असे असताना दाेन पक्ष फाेडून आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. दाेन पक्ष फाेडल्याचा कसला अभिमान बाळगता, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

” कारवाईपासून वाचण्यासाठीच अजित पवार आणि त्यांच्यासाेबतचे आमदार भाजपबराेबर गेले आहेत. भाजपबराेबर गेल्यापासून त्यांना शांत झाेप लागते. ‘ईडी’ची धाड टाकायची आणि पक्षात घ्यायचे. हे भाजपचे राजकारण सुरू आहे. पळपुटे पळून गेले, मात्र, आम्ही माेडू पण दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही”, असेही सुळे यांनी म्हंटले.

त्या पुढे म्हणाल्या, ” भाेसरीचे भाजपचे उमेदवार २० तारखेनंतर आपले खरे रूप दाखविण्याची धमकी देत आहेत. त्यांनी एका व्यक्तीला तरी धमकी द्यावी, भिती दाखवावी. महिला लाटणे घेऊन मागे लागतील. धमक्यांचा काळ आता गेला. ते जेवढ्या धमक्या देतील, तेवढी गव्हाणे यांची मते वाढतील, असेही सुळे यांनी म्हंटले आहे.

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case

Satish Wagh Murder Case | पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या पूर्वीच्या भाडेकरुने पाच महिन्यापूर्वी दिली होती सुपारी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर